जितेंद्र दखने, अमरावती : जिल्हा परिषदमधील उत्कृष्ट शिक्षकांना जि. प. स्तरावर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षी २०२२-२३ मधील प्राथमिक विभागातील १३ व माध्यमिक विभागातून १ अशा १४ शिक्षकांना सहपत्नीक पुरस्कार वितरण सोमवारी २९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मातोश्री विमलाताई देशमुख सभागृह पार पडला.
या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष सीईओ अविश्यांत पंडा होते.तर अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके,मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, प्रमुख पाहुणे डायटचे प्राचार्य मिलिंद कुबडे, डेप्युटी सीईओ बालासाहेब बायस,प्राथमिक शिक्षणाधिकारी बुध्दभुषण सोनोने, उपशिक्षणाधिकारी निखिल मानकर,अनिल कोल्हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुध्दभुषण सोनोने यांनी संचालन अजय अडीकने,आभार निखील मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होत्या.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक असे
निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांमध्ये अचलपूरमधून कल्पना चौधरी, अमरावती-रोशनी निंभोरकर, अंजनगाव-विजयकुमार सरोदे भातकुली- दीपाली बाभूळकर, चांदूरबाजार- वृषाली देशमुख, चिखलदरा- युवराज अढाऊ, दर्यापूर- कलिम खान समद खान, धामणगावरेल्वे- विनोद भोयर, धारणी- उमेश पटोरकर, मोशीं- ममता राऊत, नांदगाव खंडेश्वर, तृप्ती शिंगणवाड तिवसा- अतुल गुर्जर, वरुड- खुशाल अंबाडकर तर माध्यमिक विभागातून अमरावती हायस्कूलच्या शीतल धरमठोक यांचा समावेश आहे.