लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जनतेने महायुती सत्तेत असावी, असाच कौल दिला असताना राज्यात सत्ता स्थापनेवरून धूमशान सुरू आहे. मुख्यमंत्री कोण? यावरून भाजप-सेनेत तिढा कायम असताना दुसरीकडे संख्याबळ वाढीचा प्रयत्न दोन्ही बाजुने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी १४ अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.मुख्यमंत्री फडणवीस यांना १४ अपक्ष आमदारांनी जाहीर पाठींबा देण्यासाठी बडनेरा मतदार संघाचे आ. रवि राणा यांनी मोठी भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये रवि राणा यांच्यासह राजेश पाटील, क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, विनय कोरे, श्यामसुंदर शिंदे, विनोद अग्रवाल, किशोर जोगरेवार, महेश बालडी, संजयमामा शिंदे, राजेंद्र राऊत, प्रकाश अण्णा आवाडे, राजेंद्र श्यामगोंडा पाटील, गीता जैन यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांना जाहीर पाठींबा देण्यासाठी १४ अपक्ष आमदार एकत्र आले आहेत.विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांना पाठिंबागेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. मी अपक्ष आमदार असतानाही बडनेरा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असावेत, यासाठी अपक्ष आमदार म्हणून मी त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती आ. रवि राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आमदारकीची हॅटट्रीक साधली आहे. मतदारसंघात विकासात्मक कामे करावयाची आहे. मुख्यमंत्री आणि माझी मैत्री सर्वदूर परिचित आहे. येत्या काळात विकासकामासाठी त्यांच्यासोबत राहील, असे राणा म्हणाले.पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ आणि पारदर्शकपणे राज्याचा कारभार सांभाळला. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्रीपदी फडणवीस हेच असावे. त्यांच्या हातून लोकाभिमूख निर्णय होऊन सर्वसामान्यांची कामे पूर्णत्वास जावे, अशी अपक्ष आमदारांची भावना आहे.- रवि राणा,आमदार, बडनेरा मतदारसंघ
१४ अपक्ष आमदारांचे फडणवीसांना बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 6:00 AM
गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. मी अपक्ष आमदार असतानाही बडनेरा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असावेत, यासाठी अपक्ष आमदार म्हणून मी त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती आ. रवि राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ठळक मुद्देरवि राणा यांचाही पाठिंबा : भाजपच्या संख्येत वाढ