फोटो १४एएमपीएच१० (कॅप्शन : गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेल्या या १४ दुचाकी. )
अमरावती : बुलडाणा, वाशीम, अकोेला व अमरावती येथून चोरीच्या ९ लाख १० हजार किमतीच्या महागड्या १४ दुचाकी गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जप्त केल्या असून, तीन आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
नागपुरीगेट ठाण्यात दाखल अप. क्रमांक ४२८/२०२० भादंविचे कलम ३७९ गुन्ह्याचा तपास करीत असताना या गुन्ह्यान पोलिसांनी आरोपी मो. मुजसि्सर, खान मोहम्मद याकुब (२२, रा. तारफैल अकोला), शेख रफीक शेख युसूफ (२८ रा. लालखडी अमरावती), समीर खान महमूद खान (२५, रा. यवतमाळ ) यांना ११ डिसेंबर रोजी अटक केली होेती. त्यांची १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी सदर दुचाकी अमरावती, बुलडाणा, अकोला व वाशिम येथून चोरी केल्याची कबुली दिली. काही दुचाकी यवतमाळ जिल्ह्यात विकल्याचे सांगितले. सदर गुन्हेगारांचे संपूर्ण विदर्भात कनेक्शन असून, यात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
जप्त वाहनांच्या चेसीस क्रमांंक व इंजीन क्रमांकावरून मूळ मालकांचा शोध घेतला जाणार आहे. शहरात दररोज दुचाकीचोरी होत असताना, शहर गुन्हे शाखेची ही चांगली कामगिरी मानली जात आहे.
कोट
अटकेतील आरोपींकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तीन जिल्ह्यांतून त्या चोरून आणल्याची कबुली दिली. चोरट्यांचे जाळे संपूर्ण विदर्भात असून, आणखी काही आरोपींना अटक करण्यात येईल. ज्यांच्या दुचाकी चोरीला गेली, त्यांनी तक्रारी नोंदवायला हव्यात.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती