- संदीप मानकर
अमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्पांत सद्यस्थितीत १४.७३ टक्केच पाणीसाठा राहिल्याने शेकडो गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अजूनही दोन महिने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती अतिशय भीषण असून या प्रकल्पात ४.२२ टक्केच पाणीसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत १८.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत २०.५४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत १३.४० टक्के पाणीसाठा, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत ७.१८ टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील १०५ प्रकल्पांत सर्वात कमी ४.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने चिंता वाढली आहे. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीसुद्धा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जलतज्ज्ञांनी वर्तविली आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पीय पाणीसाठा हा ३२९६.१६ दलघमी आहे. पण आजचा उपयुक्त पाणीसाठा फक्त ४८५.६६ दलघमी आहे.
नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती चिंताजनकअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा प्रकल्पांत सध्या १७.१५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात २५.६४ टक्के पाणीसाठा, अरुणावती प्रकल्पात १२.६९ टक्के, बेंबळा प्रकल्पात २१.६१ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १४.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वान प्रकल्पात सर्वाधिक ३५.२५ टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ८.४३ टक्के, खडकपूर्णा ० टक्के, पेनटाकळी प्रकल्प ० टक्के पाणीसाठा आहे. एकूण नऊ प्रकल्पांत सरासरी १६.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. पश्चिम विदर्भातील २४ मध्यम प्रकल्पात सरासरी १९.२६ टक्के पाणीसाठा आहे. ४६९ लघु प्रकल्पांत ९.२० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
विभागातील जिल्हानिहाय टक्केवारी जिल्हा प्रकल्प यंदा ९ मे पर्यंतची मागील वर्षी ९ मे पाणीसाठा टक्केवारी पर्यंतची टक्केवारी अमरावती ८५ १८.५३ ३२.१७ यवतमाळ १२० २०.५४ १२.३० अकोला ४६ १३.४० १७.६५ वाशिम १४६ ७.१८ ७.३० बुलडाणा १०५ ४.२२ ७.३९ एकूण ५०२ १४.७३ १७.०८