अमरावती : जिल्ह्यात उपचारादरम्यान १५ कोरोनाबाधितांचा बुधवारी मृत्यू झाला. यामध्ये जिल्ह्यातील ११ व अन्य जिल्ह्यांतील चार रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८०४ बाधितांचा मृत्यू झाला. याशिवाय ७०० नव्या पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता ५७,८६५ झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी ५,८३३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७०० अहवाल पॉझिटिव्ह आले. ही पॉझिटिव्हिटी १२ टक्के आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित आहे. अमरावती शहरासह काही तालुक्यांतील चौकाचौकांत नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. यामध्ये शहरात साधारणपणे एक हजार चाचण्या या ड्राईव्हमध्ये करण्यात आल्या. यात १३ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्या व्यक्तींना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
मंगळवारी ३९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आतापर्यंत ५१,२२८ संक्रमणमुक्त झाले आहेत. ही टक्केवारी ८८.५३ आहे. याशिवाय ५,८३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये २,१८२ महापालिका क्षेत्रात, तर ३,६५१ ग्रामीण भागात आहेत. कोरोना संसर्ग वाढताच असल्याने जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर पोहोचला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
जिल्ह्यात २४ तासांत ११ रुग्णांचा मृत्यू
०००००००००
००००००००००००
०००००००००००००००००
बॉक्स
नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यातील चार मृत्यू
००००००००००००
००००००००००००००
००००००००००००००००