पंचायत राज अभियानात राज्यात तिसरी : विभागातही प्रथम, चांदूररेल्वे द्वितीयअमरावती : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये अचलपूर पंचायत समितीला राज्य पातळीवर १५ लाखांचे तृतीय पारितोषिक मिळाले. विभागातही प्रथम आली. यासाठी ११ लाखांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. विभागस्तरावर आठ लाखांचे बक्षीस मिळवीत चांदूररेल्वे पंचायत समिती द्वितीयस्थानी आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने सोमवारी हे पुरस्कार जाहीर केले. ग्रामविकास विभागाद्वारा ‘स्मार्ट व्हिलेज’ ही योजना राबविण्यात येत असल्याने या योजनेत ग्रामपंचायतीला वगळण्यात आले आहे. पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितींनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांचे मूल्यमापन विचारात घेऊन विभाग व राज्यस्तरावर अशी पुरस्कार योजना राबविण्यात आली. त्याअनुषंगाने ग्रामविकास विभागाने हे पुरष्कार जाहीर केले. राज्यस्तरावर अत्युत्कृष्ट पंचायत राज संस्थाची निवड करण्यासाठी राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची बैठक १७ मार्च रोजी पार पडली. नतर निकाल जाहीर केले आहे.दिग्रस पंचायत समितीला सहा लाखांचे बक्षीसराज्य पातळीवर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पं.स.ची तिसऱ्यास्थानी निवड झाली, तर विभाग पातळीवर प्रथम पुरस्कार मिळाला आहे. चांदूररेल्वे द्वितीय व यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पंचायत समितीला तिसरा पुरस्कार मिळाला. सहा लाखांची रोख रकम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळणार आहे.
अचलपूर पंचायत समितीला १५ लाखांचे बक्षीस
By admin | Published: April 05, 2017 12:07 AM