शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

१५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा आला अंगलट

By admin | Published: April 03, 2016 3:49 AM

पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेच्या बंदोबस्तादरम्यान १३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा अंगलट आला.

वर्षभराची वेतनवाढ रोखली : नियंत्रण कक्षातील एएसआय निलंबित अमरावती : पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेच्या बंदोबस्तादरम्यान १३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा अंगलट आला. कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी त्यांची एक वर्षांची वेतनवाढ रोखली आहे. तसेच पोलीस नियंत्रण कक्षातील कामकाजात हयगय केल्याच्या कारणावरून एका एएसआयला निलंबितसुद्धा करण्यात आले आहे. पोलीस भरती प्रक्रियेला पहाटेच सुरुवात होत असल्यामुळे अर्धातास आधीच तेथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचाऱ्यांना हजर राहावे लागतात. पोलीस भरती प्रक्रिया शिस्तबध्द व अत्यंत पारदर्शक व्हावी या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून सर्व व्यवस्था व वातावरण निर्णाण केले आहे. यादरम्यान कोणताही पोलीस कर्मचारी नियमांचे व सुचनाचे उल्लघंन करीत असेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. त्यानंतर तिन दिवसांत १५ पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामध्ये लेटलतीफ व कर्तव्यात झोपा काढत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. लेटलतीफमध्ये एपीआय जाधव, पीएसआय मीश्रा, एसएसआय राधेलाल नंदवंशी, आशिष इंगळेकर, सचिन मोहोड, जुगलकिशोर यादव, विकास गुडधे, उमेश हरणे, प्रवीण इखार यांचा समावेश असून पोलीस गस्तीदरम्यान संगणक कक्षात कर्तव्यावर झोपा काढणाऱ्यांमध्ये अमर पटेल, देवीदास उदे, सतीश बोने व अमोल यादव यांचा समावेश आहे. नियंत्रण कक्षातील एएसआय निलंबित३० मार्च रोजीच्या रात्रीला एक अपघात घडला होता. एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर फोन करून माहिती दिली. मात्र, तब्बल अर्धा तास घटनास्थळी पोलीस यंत्रणा पोहोचली नाही. त्यामुळे जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी नियंत्रण कक्षात एएसआय रवींद्र राऊत कर्तव्यावर होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ गाढवे यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. आजपासून मुलीची पोलीस भरती प्रक्रिया२९ मार्चपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली असून हजारो विद्यार्थ्यांनी विविध चाचण्या दिल्या आहेत. त्यापैकी काही उमेदवार पात्र ठरले असून त्यांच्या संपूर्ण चाचण्या शनिवारी घेण्यात आल्या आहेत. शनिवारी ७५० उमेदवारांना बोलाविण्यात आले असून त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्यात. त्यातच सात माजी सैनिकांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्यात. आता रविवारपासून महिला पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.