जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली. यावेळी जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५४,४९७ होती, त्यानंतर ३० तारखेला संचारबंदी संपल्यानंतर पुन्हा १५ दिवसांसाठी मुदत वाढविण्यात आलेली आहे. सध्या या २० दिवसांत म्हणजेच ४ एप्रिलपर्यत जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तामची संख्या ६९,५२७ वर पोहोचली आहे. म्हणजेच १५ हजारांवर रुग्ण या काळात नोंद झालेले आहे.
तसे पाहता जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली व याला अटकाव करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्रीला संचारबंदी लागू करण्यात होती. मात्र, यानंतर संसर्ग वाढताच असल्याने पुन्हा १५ दिवसां दोन टप्प्यात संचारबंदी वाढविण्यात आलेली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. या काळात जीवनावश्यकशिवाय अन्य दुकाने बंद आहेत. त्यामुळे सुपरस्प्रेडरला आता अटकाव झालेला झालेला सकाळी ७ ते ११ या दरम्यानच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा आहे. तरीही संसर्ग वाढताच असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३,०५,४७८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. चाचण्यांसाठी युवकांसह ज्येष्ठाची मोठी गर्दी होत आहे. मात्र, लसीचा पुरवठा नसल्याने लोकांना परत जावे लागत आहे.
बॉक्स
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढतीच
१) जिल्ह्यात तसे पाहता मार्च महिन्यापासूनच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र, पुरेसी अंमलबजावणी होत नसल्याने रस्त्यांवर गर्दी दिसून येते. फिजिकल डिस्टनचा वापर कुठेही होताना दिसत नाही.
२) दंडात्मक कारवाया आता कमी झालेल्या दिसत आहे. ग्रामिणमध्ये यंत्रणाद्वारा पुरेशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा व आंतर राज्य प्रवासावरची बंदी कुचकामी आहे.
३) कॉन्टक्ट ट्रेसींग कुठेच होताना दिसत नाही, त्यामुळे चाचण्यांमध्ये कमी आलेली आहे. नागरिक अंगावर लक्षणे काढत असल्याने संसर्गासोबतच आता मृत्त्यूदरात वाढ झालेली दिसत आहे.
बॉक्स
या कारणांमुळे वाढले ग्रामीण भागात रुग्ण
* जिल्हा सिमालगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे लगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली, सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणे आता अंगलट आलेले आहे.
* ग्रामीण आरोग्य विभागाद्वारा कंटेनमेंट झोन तयार करणे, हाऊस टू हाऊस सर्व्हे करणे, चाचण्यांची संख्या वाढविणे याची अंांमलबजावणी पुरेशी झालेली नाही.
* साधा ताप समजून त्याकडे दुलर्क्ष करणे, चाचण्या कमी होणे, फिजिकल डिस्टन्सचा वापर न करणे, अंांगावर दुखणे काढणे व अनेकांच्या संर्पकात येणे
पाईंटर
१ ते ३१ मार्च दरम्यान टेस्स्टींग : ९४,२१२
पॉझिटिव्ह : १२,८१७
उपचारानंतर बरे : १५,००५
कोरोनामुक्तचा दर : ११७.०७
पॉझिटिव्हिटीचा दर : १३.६०
१५ एप्रिल ते ४ मे दरम्यान टेस्टींग : ७०,९१७
पॉझिटिव्ह : १५,०३०
उपचारानंतर बरे : ९,३८१
कोरोनामुक्तचा दर : ६२.४१ टक्के
जिल्ह्याच पॉझिटिव्हिटीचा दर : २१.१९ टक्के