अमरावती : राज्याच्या शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्यातील १ याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित होणार आहेत. यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेच्या १४ आणि महापालिका क्षेत्रातील २ अशा १६ शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये उत्तम भाैतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषांवर या शाळांचे आदर्श शाळांत रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी दिली.
बॉक्स
अशा असेल आदर्श शाळा
पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक व शाळांमध्ये पाठविण्यास इच्छुक असतील.
विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून ज्ञानाची निर्मिती करता येईल.
रचनात्मक व आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षण अवगत करता येईल.
विद्यार्थ्यांची शारीरिक,बौध्दिक व मानसिक विकास होणे हे मुख्य उद्दिष्ट असेल.
विविध क्षेत्रातील कौशल्य विकसित करणारी ही शाळा असेल.
बॉक्स
अशाप्रकारे निवडल्या शाळा
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आर्दश शाळा निवडीकरिता जास्त पटसंख्या असलेली आणि शाळेत भौतिक सुविधा निर्माण करण्यास वाव असलेल्या शाळांची आदर्श शाळा म्हणून निवडण्याच्या सूचना १४ गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून एका शाळेची निवड करून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर झेडपीच्या १४ व महापालिकेच्या १ अशा जिल्ह्यातून १६ शाळांची मॉडेल स्कूलकरिता निवड झाली आहे.
बॉक्स
या आहेत आदर्श शाळा
तालुका शाळेचे नाव पटसंख्या
अचलपूर जि.प. शाळा हरम १९५
अमरावती जि.प.शाळा नांदुरा बुद्रुक १०१
महापालिका अल्लामा इकबाल मनपा उर्दूशाळा न.२ ७७६
महापालिका शासकीय विद्यानिकेतन ९८
अंजनगाव सुर्जी जि.प.उच्च प्राथमिक शाळा पांढरी २८०
भातकुली जि.प.उच्च उर्दू प्राथमिक शाळा टाकरखेडा १०२
चांदुर बाजार जि.प.उच्च प्राथमिक उर्दू शाळा तळेगाव मोहना १३७
चांदुर रेल्वे जि प उच्च प्राथमिक शाळा जळका जगताप १३८
चिखलदरा जि प उच्च प्राथमिक शाळा गांगरखेडा १०२
दर्यापुर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा येवदा १७६
धामणगाव रेल्वे जि प प्राथमिक शाळा अंजनसिंगी १३५
धारणी जि प. प्राथमिक शाळा खिडकीकलम १४२
मोशी जि.प.उच्च प्राथमिक मुलींची शाळा नेरपिंगळाई ३६५
नांदगाव खंडेश्वर जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिवणी रसुलापुर २२५
तिवसा जि प.उच्च प्राथमिक शाळा मार्डी १२७
वरुड जि.प. प्राथमिक शाळा बेनोडा २३१