शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

नांदगाव पेठ येथे १६ टन गोमांस जप्त

By admin | Published: April 11, 2016 12:16 AM

गोमांसाने लादलेला नागपूरवरून अमरावतीकडे जाणारा ट्रक बजरंग दल कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अनुराधा पेट्रोल पंपाजवळ पकडला.

बजरंग दल, पोलिसांची कारवाई : मांसाचे नमुने प्रयोगशाळेतनांदगाव पेठ : गोमांसाने लादलेला नागपूरवरून अमरावतीकडे जाणारा ट्रक बजरंग दल कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अनुराधा पेट्रोल पंपाजवळ पकडला. आरोपी चालकास नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली असून दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने संधी साधून शोएब अहमद खान जाकीर कॉलनी अमरावती यांच्या मालकीच्या एमएच ३२ क्यू ७१३ हा ट्रक गोमांस घेऊन नागपूर येथून अमरावती येथे जाताना बजरंग दल संयोजक बाबू गहरवाल व अन्य कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना सूचना देऊन स्वत: ट्रकचा पाठलाग करून टोल नाक्याजवळील अनुराधा पेट्रोलपंप येथे ट्रक पकडला. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे एपीआय आर. आर. जाधव व त्यांच्या चमूंनी आरोपी ट्रकचालक रवि शंकरराव घुले (२५) याला ताब्यात घेतले. १५ ते १६ टन गोमांस असल्याची शक्यता असून शोएब अहमद खान जाकीर कॉलनी अमरावती येथे मांस घेऊन जात असल्याची कबुली चालकाने दिली. गोमांस वाहतूक करण्याचा प्रकार म्हणजे कायद्याची अवहेलना असून यावर कडक कारवाईची मागणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक संतोष ऊर्फ बाबू गहरवाल, रोशन बोकडे, सत्यजित राठोड, उमेश डोईफोडे, महादेव बनासुरे, गजानन तिजारे, सोनू बैस, दिलीप नागापुरे, बंटी शेंदरकर यांनी केली आहे.(वार्ताहर)