अमरावती : जिल्ह्यात रविवारी उपचारादरम्यान १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,२५० वर झालेली आहे. याशिवाय अकोला येथील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. रविवारी १,१७६ नव्या पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८२,९३० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात रविवारी ४,८८८ चाचण्या करण्यात आल्या. यात १,१७५ पॉझिटिव्ह व २४.०३ टक्के पॉझिटिव्हिटची नोंद झालेली आहे. जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी साडेचार महिन्यांपासून सतत वाढतीच असल्याने आरोग्य प्रशासनावरील ताण वाढला आहे. रविवारी दुपारी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा व प्रामुख्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना केल्या आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, रविवारी उपचारानंतर बरे वाटल्याने १,२८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ७१,००९ नागरिकांना संक्रमणमुक्त करण्यात आले. ही टक्केवारी ८५.६३ इतकी आहे. याशिवाय जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १.५१ टक्के आहे.
बॉक्स
रविवारी २४ तासांतील मृत्य
उपचारादरम्यान ७० वर्षीय पुरुष, मोर्शी, ३६ वर्षीय पुरुष, दर्यापूर, ५४ वर्षीय महिला, दर्यापूर, ३४ वर्षीय पुरुष, राजुरा, ६१ वर्षीय महिला, मोर्शी, ६० वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर, ४६ वर्षीय महिला, अचलपूर, ६५ वर्षीय महिला, रुख्मिनीनगर, अमरावती, ६९, महिला, राजापेठ, ६५ वर्षीय पुरुष, परतवाडा, ७०, पुरुष, अचलपूर, ६० वर्षीय पुरुष, पोही, अंजनगाव, ४३ वर्षीय पुरुष, शिरजगाव, ३० वर्षीय पुरुष, मोर्शी, ४५ वर्षीय महिला, अचलपूर, ४१ वर्षीय पुरुष, विश्वशांती नगर, अमरावती व ४९, पुरुष, धामणगाव रेल्वे तसेच ४७ वर्षीय पुरुष, मूर्तिजापूर या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.