शोधकार्य सुरू, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण
चांदूर रेल्वे : शहरानजीकच्या सरस्वती तलावात १७ वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता घडली. रा. सतीश रेखवार (१७, रा. चांदूरवाडी) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. चांदूर रेल्वे पोलिसांनी त्याला पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला.
पोलीस सूत्रांनुसार, चांदूर रेल्वे शहराजवळून काही अंतरावर असलेल्या सरस्वती तलावात शुभम संजय शिंदे, ऋषीकेश जनार्दन राऊत व लखन ज्ञानेश्वर शेळके (रा. चांदूरवाडी) हे तिघे अल्पवयीन आंघोळ करीत होते. पोहता येत नसल्यामुळे तिघेही एका बाजूला आंघोळ करीत असताना रा. रेखवार हासुद्धा आंघोळ करण्यासाठी आला. त्याने मागून येऊन थेट तलावात उडी घेतली. मात्र, उडी मारल्यानंतर तो परत वर आलाच नाही. त्यामुळे इतर मुलांनी ही माहिती काही नागरिकांना दिली. चांदूर रेल्वे ठाण्यात ही माहिती धडकताच ठाणेदार मगन मेहते, पोलीस उपनिरीक्षक विलास धोंडे, चालक जगदीश राठोड व होमगार्ड हे घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला याच पथकाने मुलाचा शोध घेतला. यानंतर ठाणेदार मगन मेहते यांनी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्यामार्फत रेस्क्यू टीमला पाचारण केले. मात्र, अंधार झाल्यामुळे रेस्क्यू टीम उद्या येण्याची शक्यता आहे.