अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत बिच्छुटेकडी राहुलनगरातून ६० हजार रुपये किमतीच्या पितळी १७ मूर्ती अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
या संदर्भात फिर्यादी सागर भिमराव वानखडे (३५, रा. राहुलनगर) यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी हे परिवारासह बाहेरगावी गेले होते. त्यानंतर आजी घरी आली असता तिला चोरी झाल्याची लक्षात आले. तिने ही माहिती सागरला दिली. त्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. सागर हा पितळची मुर्ती तयार करून ते घरूनच विक्री करण्याचे काम करतो. फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून श्वान पथकाला पाचारण केले होते. अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास फ्रेजरपुरा ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम करीत आहेत.