बाकी/शिल्लक राहिलेल्या खातेदारांना
उद्दिष्ट नुसार पीक कर्ज वाटप करण्यासाठी गावनिहाय खातेदार याद्या तयार करून तलाठी व बँक मित्र यांना देणे,
तलाठ्यांनी 7/12 आणि 8अ देणे
सबंधित खतेदारांनी आपल्या बँकेत स्वयंघोषणा पत्र देणे
पीक कर्ज मंजुरी लवकरात लवकर होईल
जुने नियमित खातेदारांना 7/12,आणि 8 अ आणि स्वयंघोषणा पत्र
नविन खातेदारांना या शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयचे परिपत्रक नुसार कागदपत्रे द्यावी लागतील
फोटो पी ०३ चांदूररेुल्वे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जवाटपात आघाडीवर
चांदुर रेल्वे : तालुक्यातील चालू वर्षा करिता सर्व बँकांनी शेतकऱ्यांना खरिपाचे किती कर्ज वाटप केले ठरलेले उद्दिष्ट सफल झाले काय याचा आढावा आज तहसील कार्यालयात राजेंद्र इंगळे तहसीलदार चांदूर रेल्वे यांनी घेऊन सर्व बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या यात जिल्हा सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक स्टेट बँकेचे अधिकारी सेंट्रल बँकेचे अधिकारी बँक ऑफ इंडियाचे अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी या सभेला विशेष करून उपस्थित होते यात राष्ट्रीय बँकाचे कर्ज वाटपात माघारले झाल्याचे दिसून आले कर्ज वाटप यादी जिल्हा सहकारी बँक राजुरा दोन कोटी 47 लाख सहकारी बँक घुईखेड 2 कोटी 22 लाख सहकारी बँक चांदुर रेल्वे 5 कोटी 3 लाख सहकारी बँक आमला विश्वेश्वर 1 कोटी 25 लाख बँक ऑफ इंडिया शाखा चांदूर 89 लाख घुईखेड स्टेटबँक शाखा 1कोटी 50लाख सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदुर 27 लाख स्टेटबँक शाखा चांदुर रेल्वे 1कोटी 67 लाख बँक आफ इंडिया मालखेड 52लाख बँक आफ महाराष्ट्र चांदुर 1कोटी 25लाख स्टेटबँक शाखा पळसखेड 55लाख सेंट्रल बँक शाखा चांदुर 32 लाख असे खरीप पिक कर्ज वाटप करण्यात आले या वर्षी खरीप पिकाचे उदिष्ट 42 कोटी 47 लाख ठेवण्या आले अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली
===Photopath===
030621\img-20210603-wa0019.jpg
===Caption===
photo