अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोनाकाळात १८ लाख ५,२६६ रक्त चाचण्या करण्यात आल्या. एप्रिल आणि मे महिन्यात ११२४ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये ५९७ महिलांचे सिझेरियन करावे लागले. तसेच ५०४ महिलांना अन्य रुग्णालयातून रेफर करण्यात आले होते. तसेच ३१,८०५ महिलांची रक्त, लघवी तपासणी करण्यात आली. सोनोग्राफी मात्र झालेल्या नाहीत.
गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना बाळ कसे वाढत आहे, हे पाहण्यासाठी काही कालावधीनंतर रक्त, लघवी तपासणी आणि सोनोग्राफी करावी लागते. पण, कोरोनामुळे मागील वर्षात १८ लाख ५ हजार २६६ रक्त व लघवी तपासणी करण्यात आल्यात. ८७९ सोनोग्राफी करण्यात आल्या. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा स्त्री रुग्णालयातील आळीपाळीने सर्वच डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी स्टाफ भरडले गेले. त्यामुळे सोनोग्राफी मशीन बंदच ठेवावी लागली. त्यातच काही कर्मचाऱ्यांची ड्यूटी कोविड सेंटरवर लावण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रसूतीकरिता महिलांची संख्यादेखील वाढली होती. शंभर-सव्वाशे महिला रोज दाखल होऊ लागल्याने बेड कमी पडल्याचा प्रसंग ओढावला. त्यामुळे अल्प मनुष्यबळाच्या भरवशावर ही सगळी जबाबदारी पार पाडावी लागली. मात्र, सोनोग्रामफी सेंटर बंद राहिल्याने गर्भवती महिलांना खासगीत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागली. यात कर्मचाऱ्यांची दमछाक झाली खरी, पण कर्तव्य बजावताना रुग्णांना येथील समस्यांची जाणीव मात्र कर्मचाऱ्यांनी होऊ दिली नसल्याचे अधीक्षिका डॉ. विद्या वाठोडकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
बॉक्स
असा आहे डफरीनमध्ये मनुष्यबळ
डफरीन हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून महिला प्रसूतीकरिता येतात. त्यासाठी येथे२० डॉक्टर्स, ६० सिस्टर्स, १०० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा स्टाफ तैनात आहे. त्यातील सर्वच रुग्णांना कोरोनातून जावे लागले. मात्र, आळीपाळीने ही समस्या उदभवल्यामुळे मनुष्यबळ मेन्टेन करण्यास मदत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
-
किमान दोन चाचण्या आवश्यक
गर्भधारणेनंतर ४ ते ५ व्या महिन्यात सोनोग्राफी करणे गरजेचे असते. यामध्ये बाळाची वाढ नीट होते काय? बाळ सुदृढ आहे काय? त्यात काही अवयवांची सुरळीत वाढ होते की नाही, व्यंगत्व आहे काय, या बाबींची सुश्रुषा होते. त्यानंतर दुसरी सोनोग्राफी शेटच्या महिन्यात करणे गरजेचे आहे. जेणेकरून बाळाची पोझिशन कशी आहे? नाळ गळ्याभोवती कशा प्रकारे आहे? बाळ आडवा आहे की उभा, याची खात्री पटविण्याकरिता शेवटची सोनोग्राफी अत्यंत महत्त्वाची असते.
कोट
कोरोनाकाळातही येथे प्रसूतीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत होते. एप्रिल व मे महिन्यात ११२४ प्रसूती झाल्या. ३१६०५ रक्त-लघवी तपासणी करण्यात आल्या. मात्र, सोनोग्राफी सेंटर बंद राहिमुळे रुग्णांना खासगीतून ती प्रक्रिया पूर्ण करावी लागली. परंतु विना सोनोग्राफीचे एकही रुग्ण नव्हते.
- डॉ. विद्या वाठोडकर,
अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय
पॉईंटर
वर्षभरात जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या प्रसूती - ८०४४
किती बालकांत व्यंगत्व- ००
किती टक्के महिलांनी आधी तपासणी केली नाही ० टक्के