लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत २२ सप्टेंबर या ‘डेडलाईन’पर्यंत जिल्ह्यात एक लाख ९६ हजार १२८ अर्ज दाखल झाले आहेत. अद्याप ३० हजार शेतकºयांचे अर्ज भरावयाचे आहेत. मात्र मुदतवाढीसाठी कोणतेच आदेश नसल्यामुळे आता अर्जांची पडताळणी व चावडी वाचनाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी दोन लाख २५ हजार शेतकरी पात्र आहेत. यामध्ये एक लाख ६७ हजार शेतकरी थकबाकीदार, ४३ हजार शेतकरी चालू खातेदार आहेत. तर २० ते २५ हजार शेतकºयांचे कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार अखेरच्या मुदतीपर्यत तीन लाख ६० हजार ७५ शेतकºयांनी नोंदणी केलेली आहे. यातुलनेत एक लाख ९६ हजार १२८ शेतकºयांनी शुक्रवारपर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतकºयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.योजनत सुरुवातीपासून अडथडे आल्यानेच अर्ज भरणे बाकी असल्याचा आरोप होत आहे. शेतकºयांनी भरलेल्या आॅनलाईन अर्जाची यादी तसेच बँकांनी थकबाकीदारांच्या दिलेल्या याद्यांचे चावडी वाचन होणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश थकबाकीदार शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र, अद्याप तीस हजारावर शेतकºयांचे अर्ज भरणे बाकी असल्याने किमान एक आठवडा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. तूर्तास मुदतवाढीविषयी कुठलेही शासन संकेत नाहीतजिल्ह्यात कर्जमाफी संदर्भात १,९६,१२८ आॅनलाईन अर्ज भरल्या गेलेले आहेत. या योजनेत कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे. मात्र कुटूंबातील अनेकजन खातेदार असल्यामुळे नोंदणी जास्त दिसते. जवळपास सर्वच पात्र शेतकºयांनी अर्ज भरले आहे.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी
अखेरच्या दिवसापर्यत १.९६ लाख अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:14 PM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत २२ सप्टेंबर या ‘डेडलाईन’पर्यंत जिल्ह्यात एक लाख ९६ हजार १२८ अर्ज दाखल झाले आहेत.
ठळक मुद्देकर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज : मुदतवाढ नाही, आता पडताळणीची प्रतीक्षा