शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

१९ हजार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

By admin | Published: June 27, 2017 12:03 AM

जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे.

दोन आठवड्यांपासून केंद्र बंद : चार लाख क्विंटल तूर घरी पडूनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील तूर खरेदीचे शासकीय केंद्र दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १० जूनपासून बंद आहे. ृटोकन दिलेल्या १९ हजार शेतकऱ्यांची चार लाख १६ हजार क्विंटल तूर खरेदी अभावी अद्याप शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. कर्ज थकीत असल्याने बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाहीत. तुरीचे महिनाभरापूर्वीचे चुकारे नाहीत. शेतकरी अडचणीत असताना केंद्रांना मुदतवाढीचे आश्वासन देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.केंद्र शासनाने जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जून पर्यंत १५ हजार मेट्रिक टन तूर खरेदीची परवानगी दिली होती. यामुदतीत बाजार समितीमध्ये उघड्यावरील तूर खरेदी करण्यात आली व उर्वरित शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. पावसाळी वातावरण असल्याने तूर ओली होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना घरीच तूर ठेवण्यास सांगण्यात आले असून त्यांना तूर खरेदीचा अनुक्रमांक आल्यानंतर बाजार समितीव्दारा फोन करण्यात येईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी निश्चिंत झाले. याकालावधीत यंत्रणेव्दारा बाजार समितीच्या मार्केट यार्डात असलेली तूर खरेदी करण्यात आली. व्यापाऱ्यांद्वारा बेभाव खरेदीअमरावती : टोकन दिलेल्या व शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीच्या खरेदीसाठी फोन न करताच शासकीय खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत असताना शासनाने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शासनाने काही प्रमाणात कर्जमाफी केली असली तरी याविषयीचे आदेश बँकाना अद्याप प्राप्त नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ३३ हजार शेतकऱ्यांना थकीत संबोधून बँकाव्दारा कर्ज नाकारले जात आहे. मे महिन्यातील तुरीचे चुकारे अद्याप व्हायचे आहेत. अशा स्थितीत चार लाख १६ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी मातीमोल भावाने तुरीची खरेदी करीत असल्याचे विदारक चित्र आहे.खरेदी बाकी असलेल्या तुरीची स्थितीअचलपूर तालुक्यात टोकन दिलेल्या १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती ३,६५० शेतकऱ्यांची १,०२,४६९, अंजनगाव सुर्जी २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७, चांदूरबाजार १,२३३ शेतकऱ्यांची २५,६११,चांदूररेल्वे १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२, दर्यापूर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगाव ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३, धारणी ७४ शेतकऱ्यांची १,१६४, मोर्शी १,९१५ शेतकऱ्यांची ३४,३४५, नांदगाव खंडेश्वर १,७९२ शेतकऱ्यांची २१,१५३ व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ क्विंटल तूर खरेदीअभावी घरी पडून आहे.