शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

१९३ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Published: June 22, 2017 12:20 AM

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या ७५७ पैकी १९३ उमेदवारांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या ३० दिवसांच्या आत खर्च सादर केला नसल्याने ....

जिल्हा प्रशासनाच्या नोटीस : विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर नाहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या ७५७ पैकी १९३ उमेदवारांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या ३० दिवसांच्या आत खर्च सादर केला नसल्याने प्रशासनाने त्यांना नोटीस बजावल्या असून यासर्व उमेदवारांना आॅगस्टपूर्वी अनर्ह ठरविण्याची कारवाई केली जाणार आहे.यावर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला व मतमोजणी २३ तारखेला झाली. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत म्हणजेच २५ मार्च २०१७ पूर्वी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक होते. यावेळी जि.प.साठी ४१७ व पंचायत समितीसाठी ५३३ असे एकूण ९५० उमेदवार रिंगणात होते. यापैकी जिल्हा परिषदेच्या ३४० व पंचायत समितीच्या ४१७ उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर केला. मात्र, जिल्हा परिषदेच्या ७७ व पंचायत समितीचे ११६ अशा एकूण १९३ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. त्यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने नोटीस बजावल्या आहेत. यासर्व उमेदवारांवर त्यांना अनर्ह घोषित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.उमेदवारी खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांमध्ये अंजनगाव बारी गटात ५, शिरजगाव कसबा व कापूसतळणी येथे प्रत्येकी ४, हिवरखेड गटात ६, आसेगाव, राजुरवाडी, शिराळा, पुसदा, वलगाव, पिंपळोद, येवदा व लोणी गटात प्रत्येकी तीन, हातरू, करजगाव, पुसला, नांदगाव पेठ, हरिसाल, राणीगाव, फुबगाव, वाढोणा रामनाथ येथे प्रत्येकी २, तर मंगरूळ चव्हाळा, घुईखेड, आसरा, भंडारज, दिया, पथ्रोट, शिरजगाव बंड, कुऱ्हा, नेरपिंगळाई, अंबाडा व वऱ्हा येथे प्रत्येकी एका उमेदवाराने निवडणूक खर्च सादर केलेला नाही. यासर्व उमेदवारांवर आता आवश्यक प्रक्रियेव्दारे अनर्हतेची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व सदस्यांचे पद धोक्यात आले आहे. या आदेशांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता काय पाऊल उचलले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंसच्या ११२ उमेदवारांना बजावल्या नोटीसजिल्ह्यात निवडणूक झालेल्या ११२ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. यामध्ये राजुरवाडी गणात ७,वलगाव ५,येवदा, रेवसा, चंद्रपूर, खरपी, अंबाडा,व खेड गणात प्रत्येकी ४, हतरु, कुऱ्हा, शिराळा, कठोरा, अंजनगाव बारी, कविठा बु.व कापुसतळणी गणात प्रत्येकी ३ जनुना, लोणी, निमखेद बाजार, खानमपूर पांढरी, मासोद, पुसदा, चुर्णी, तेलखार, टेंब्रुसोडा, देऊरवाडा व तळवेल येथे प्रत्येकी २ तसेच काटकुंभ, चिखली, खटकाली, शिरजगाव कस्बा, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, थुगावपिंप्री,खानापूर, नेरपिंगळाई, पुसला, सातनूर, टेंभुरखेडा, लोणी, मांगरूळी, वाठोडा, यावली, माहुली धामणगाव, पथ्रोट, परसापूर रासेगाव, असदपूर, भंडारज, कोकर्डा, वडनेर गंगाई खल्लार, शिंगणापूर, गायवाडी, पिंपळोद, साऊर, आसरा, धानोरा फसी, फुबगाव आदी गणात प्रत्येकी एका उमेदवाराने निवडणूक खर्च सादर केलेला नाही.