प्रदीप भाकरे।आॅनलाईन लोकमतअमरावती : श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांस्कृतिक भवनाच्या भाडेवसुलीमध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी तत्कालीन अधीक्षकांसह सहा कर्मचाºयांना दोषी ठरविण्यात आले आहे. या संपूर्ण अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली असून, डोनारकर वगळता पाचही दोषी कर्मचाऱ्यांकडून २० लाख रुपयांची वसुली करण्याचे आदेश जारी करण्यात येणार आहेत. पाचपैकी तिघे सेवानिवृत्त झाले, तर उर्वरित दोघे महापालिका सेवेत आहेत.महापालिका सेवेत असलेले निरीक्षक रामदास वाकपांजर आणि कनिष्ठ लिपिक अनिकेत मिश्रा या दोषींनी वसुलीची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर सेवेतून बडतर्फ होण्याची टांगती तलवार आहे.तत्कालीन नगरसेवक प्रदीप बाजड यांनी सांस्कृतिक भवनातील अनियमिततेवर प्रकाशझोत टाकला होता. प्राथमिक चौकशीत अनियमितता उघड झाल्यानंतर याप्रकरणी संबंधितांविरूद्ध निलंबन तसेच फौजदारीची कारवाई करण्यात आली. २०११ चे हे प्रकरण असताना सन २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशान्वये दोघांचे निलंबन व एकूण सहा जणांविरुद्ध फौजदारी दाखल करण्यात आली होती.तत्पूर्वी, १२ डिसेंबर २०१४ रोजी या चौकशीची जबाबदारी तत्कालीन उपायुक्त चंदन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी याप्रकरणी बाजार परवाना विभागातील कनिष्ठ लिपिक अनिकेत मिश्रा, पंकज डोनारकर, तत्कालीन अधीक्षक एस.ए. भागवत (सेवानिवृत्त) आणि सतीश देशमुख (सेवानिवृत्त), श्रीराम आगाशे (सेवानिवृत्त), रामदास वाकपांजर या तिघा निरीक्षकांसह एकूण सहा कर्मचाऱ्यांना दोषी ठरविले.भाडेवसुलीची रक्कम नियोजित दरापेक्षा कमी वसुली करण्यात आली. यासाठी मिश्रा व डोनारकर हे दोनच कर्मचारी पूर्णत: जबाबदार असल्याने मुख्य लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार, अनिकेत मिश्रा हे १९,२४,१५४ रुपयांसाठी व डोनारकर ९६,२०३ रुपयांसाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष चौकशी अधिकाºयांनी काढला.संपूर्ण सहाही कर्मचारी शिक्षेस पात्र असल्याचे निरीक्षण विभागीय चौकशी अधिकारी चंदन पाटील यांनी नोंदविले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने अंतिम दोषारोपपत्र निश्चित केले असून, निर्णायक वसुलीच्या कार्यवाहीसाठी ते आयुक्तांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत.अनिकेत मिश्रा सर्वाधिक दोषीबाजार परवाना विभागातील तत्कालीन कनिष्ठ लिपिक तथा तूर्तास शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अनिकेत मिश्रा याला संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड ठरविण्यात आले आहे. २० लाखांच्या या अनियमिततेमध्ये सहाही जण दोषी ठरल्याने तत्कालीन अधीक्षक एस.ए. भागवत (सेवानिवृत्त) व अनिकेत मिश्राकडून प्रत्येकी ५,५१,९६० रुपये, श्रीराम आगाशेकडून ३,५५,४९९ रुपये, बाजार परवानातील विद्यमान निरीक्षक रामदास वाकपांजरकडून ३,६५,४६३ रुपये व सतीश देशमुखकडून ९९,२७२ रुपये वसूल करण्याचे आदेश बुधवारी पारित करण्यात येणार आहेत.डोनारकर बडतर्फ, तिघे सेवानिवृत्तसहा आरोपींपैकी पंकज डोनारकर याला याआधीच बडतर्फ करण्यात आले, तर सतीश देशमुख, श्रीराम आगाशे व एस.ए. भागवत सेवानिवृत्त झाले आहेत. वाकपांजर आणि मिश्रा अनुक्रमे बाजार परवाना आणि शिक्षण विभागात कार्यरत आहेत.अशा होत्या तक्रारीसांस्कृतिक भवनाची भाडेवसुली नियमानुसार करण्यात येत नाही. अशाप्रकारे कमी करण्यात आलेल्या वसुलीची अंदाजित रक्कम लाखोंच्या घरात असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर यातील मोठी अनियमितता उघड झाली होती.
दोषी कर्मचाऱ्यांकडून २० लाखांची ‘रिकव्हरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:23 AM
श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांस्कृतिक भवनाच्या भाडेवसुलीमध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी तत्कालीन अधीक्षकांसह सहा कर्मचाºयांना दोषी ठरविण्यात आले आहे.
ठळक मुद्देसांस्कृतिक भवन घोटाळा : दोघांवर बडतर्फीची तलवार