फोटो कॅप्शन - वाहनापुढे २० मिनिटे चालत गेलेला वाघ.
फोटो कॅप्शन - वैराट पस्तलई येथील शाळेत शिक्षिका संगीता सोळंके.
------------------------------------------------------------------------------------
मेळघाटातील शाळेत तीन विद्यार्थी, दोन शिक्षिका, पस्तलई मार्गावरील घटना
वीस मिनिट शाळेत निघालेल्या शिक्षिकेला रस्त्याने वाघोबाचे दर्शन
फोटो पुढे वाघोबा मागे चारचाकीत शिक्षिका
चिखलदरा (अमरावती) : वैराट पस्तलई येथील शाळेत निघालेल्या शिक्षिकेला शनिवारी सकाळी ८ वाजता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वाघोबाने तब्बल २० मिनिटांपर्यंत दर्शन दिले. पुढे वाघोबा आणि मागे शिक्षिकेचे चारचाकी वाहन असा हा प्रसंग होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांचे पुनर्वसन झाल्याने वैराट पस्तलई परिसरात वाघ असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
संगीता सोळंके या जिल्हा परिषदेच्या चिखलदरा तालुक्यातील पस्तलई शाळेवर शिक्षिका आहेत. शनिवारी त्या शाळेवर जात असताना रेंजर कॉलेज गेटवरून तीन किलोमीटर आत त्यांना रस्त्यावर वाघोबाने दर्शन दिले. चारचाकी वाहनात शिक्षिका व चालक दोघे जण होते. पुढे वाघोबा आणि मागे वाहन असा हा वीस मिनिटांचा थरार त्यांनी अनुभवला.
---------------
गंगूबाईला दररोज ऐकतात डरकाळी
शाळेमध्ये खिचडी शिजविण्यासाठी गंगुबाई कार्यरत आहेत. त्या येथेच राहतात. रोज सायंकाळी, रात्री त्यांना वाघोबाची डरकाळी ऐकू येत असल्याचे नेहमीच त्या शिक्षिकांना सांगत होत्या. परंतु, शनिवारी प्रत्यक्षात डोळ्यांसमोर वाघोबा अवतरल्याचे शिक्षिका संगीता सोळके (इंझाळकर ) यांनी लोकमतला सांगितले.
बॉक्स
तीन विद्यार्थी, दोन शिक्षिका
चिखलदरा नजीकच्या वैराट पस्तलई या गावाचे पुनर्वसन झाले असले तरी एक परिवार न गेल्यामुळे तेथे तीन विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षिका शाळा चालवित आहेत. हा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या शाळेवर संगीता सोळंके व पाचवडे या दोन शिक्षिका असून, पन्नास टक्के उपस्थितीच्या अटीमुळे असल्याने एक शिक्षिका हजर राहत असल्याचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांनी सांगितले.
बॉक्स
पर्यटन, सफारी बंद
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत चिखलदरा परिक्षेत्रात पुनर्वसित वैराट पस्तलई, चुर्णी गावांचा समावेश आहे. पुनर्वसन झाल्यावर या परिसरात गवती कुरणावर काम झाल्याने तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे. मोठ्या प्रमाणात सांबर, रानगवे, अस्वल, बिबट्या, वाघ दर्शन देतात. काही दिवसांपासून व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी पूर्णतः बंद आहे. पुनर्वसनामुळे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात दिसू लागले असल्याचे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी लोकमतला सांगितले.
कोट
शनिवारी शाळेत जात असताना वैराट पस्तलई मार्गावर २० मिनिटांपर्यंत वाघोबा पुढे व आमचे वाहन मागे असा थरार अनुभव आम्ही अनुभवला.
संगीत सोळंके, शिक्षिका
कोट
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनवर्सनामुळे वाघांना मोकळा श्वास मिळाला आहे. मेळघाटातील स्थानिक रहिवासी व मेळघाट प्रशासनाच्या मेहनतीच हे यश म्हणता येईल. मेळघाटातील स्वेच्छेने पुर्नवसन होण्यास इच्छुक असलेल्या गावांचे तातडीने पुर्नवसन होणे अपेक्षित आहे.
- यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ