अमरावती : जिल्ह्यात नोंद झालेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताला सोमवारी १० महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत जिल्ह्यात १९ हजार ९३७ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. रोज सरासरी ६६ संक्रमितांची नोंद होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
येथील हाथीपुऱ्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. हा रुग्ण ‘होमडेथ’ होता. कोरोना संशयित असल्याने आरोग्य विभागाने या रुग्णासह त्याच्या कुटुंबातील हायरिस्कमधील व्यक्तींचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविले होते. यामध्ये चार नमुने पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात पहिले १०० रुग्णांची नोंद व्हायला ४० दिवस लागले. मात्र, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढायला लागला. त्यानंतरच्या १३ दिवसात २९ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २०० वर पोहोचली. १९ जूनला ४०० रुग्णांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.
यानंतर ११ जुलौ रोजी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८०० वर पोहोचला. केवळ २२ दिवसात रुग्णसंख्या दुप्पट झाली. यानंतर फक्त १३ दिवसात म्हणजेच २४ जुलै रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या १६०० वर पोहोचली. यानंतर १८ दिवसात १८ ऑगस्टला ३०० व ४ सप्टेंबरला ६,००० कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. यापुढे २४ दिवसात म्हणजेच २५ सप्टेंबरला कोरोनाचे १२ हजार क्राॅस झाले. १५ ऑक्टोबरला १३,५०० क्राॅस, १ नोव्हेंबरला १५ हजार ३५७, १५ नोव्हेंबरला १६ हजार ९१७, १ डिसेंबरला १७ हजार ९२२ व आता ४ जानेवारीला १९ हजार ९३७ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.
बॉक्स
रोज एक हजारावर चाचण्या
जिल्ह्यात सध्या ५५३ ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची याशिवाय उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी व एजंट यांची कोरोना चाचणी अनिवार्य आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात नमुने संकलित केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रोज एक ते दीड हजार नमुन्याची तपासणी विद्यापीठ लॅबद्वारे केली जात आहे.
बॉक्स
कोरोनाची जिल्ह्यात सद्यस्थिती
जिल्ह्यात सोमवारी ३६ पॉझिटिव्ह अहवालाची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९३७ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान बरे वाटल्याने सोमवारी ०००० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ०००० झालेली आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९६.३३ टक्के असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.