अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने ‘झिरो स्क्रॅप’ मिशन अंतर्गत ३० एप्रिल ते १० ऑक्टोबर २०२३ दरम्यान कालबाह्य झालेले लोखंडी साहित्य, वस्तुची ई-निविदाद्वारे विक्री केली आहे. यात लक्ष्यांकापेक्षा जास्त उत्पन्ना प्राप्त केले असून २०२.२५ कोटींचा महसूल रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये पाचही विभागीय रेल्वे विभागाचा समावेश आहे.
मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रबंधक नरेश लालवानी यांच्या मार्गदर्शनात पुणे, नागपूर, सोलापूर, भुवाळ व मुंबई विभागीय प्रमुख, रेल्वे मंडळ प्रबंधकांच्या सहकार्याने स्क्रॅप विक्रीतून २०० कोटींचा महसूल उत्पन्नाचा मैलाचा दगड पार केला आहे.
मध्य रेल्वेने १३५ कोटींच्या अनुपातिक विक्री लक्ष्य गाठताना सप्टेबर २०२३ पर्यंत २०२.२५ कोटींचे महसूल प्राप्त केल्याची नोंद केली आहे. ‘झिरो स्क्रॅप’ मिशन अंतर्गत प्रत्येक मंडळ, कारशेडमध्ये वेळेपूर्वी स्क्रॅपमुक्त करण्यात आले आहे. यामध्ये जुने रेल्वे ईंजीन, डिझेलवर चालणारे ईंज़ीन तसेच अपघातग्रस्त रेल्वे ईंजीन, डबे, रेल्वे रूळांचा समावेश आहे. यंदा आर्थिक वर्षात मध्य रेल्वे मुंबई विभागाने ‘झिरो स्क्रॅप’ मिशन अतंर्गत ३०० कोटींच्या महसूलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या साहित्यांची झाली विक्री
• १३, ६६२ मेट्रिक टन रेल्वे रूळ• १२ रेल्वे ईंजीन• १७४ रेल्वे कोच• १०७ मालगाडीचे डबे (भुसावळ मंडळात जामनेर ते पाचाेरा नॅरगेज लाईन)
स्क्रॅप विक्रीतून अशी झाली कमाई
• भुसावल मंडळ- ४०.६५ कोटी• माटुंगा रेल्वे डेपो - ३०.९७ कोटी• मुंबई मंडळ ३०.०७ कोटी• भुसावल के इलेक्ट्रिक लोको शेड डेपो - १९.०८ कोटी• पुणे मंडळ १८.६२ कोटी• नागपूर मंडळ- १३.९० कोटी• सोलापूर मंडळ- १३.२४ कोटी• मध्य रेल्वेचे अन्य स्थानक - २६.९२ कोटी