शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मैत्रेयविरुद्ध राज्यात २१ गुन्हे, जानेवारीत मंत्रालयात बैठक : मैत्रेय ग्राहक-प्रतिनिधी अन्याय निवारण समितीचा लढा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 9:48 PM

 हजारो नागरिकांची कोट्यवधीने फसवणूक करणाºया मैत्रेय कंपनीविरुद्ध राज्यभरात २१ गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी चर्चा घडवून आणण्यासाठी जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मैत्रेय ग्राहक-प्रतिनिधी अन्याय निवारण समितीला दिले. 

अमरावती :  हजारो नागरिकांची कोट्यवधीने फसवणूक करणाºया मैत्रेय कंपनीविरुद्ध राज्यभरात २१ गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी चर्चा घडवून आणण्यासाठी जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मैत्रेय ग्राहक-प्रतिनिधी अन्याय निवारण समितीला दिले.     राज्यभरातील हजारो नागरिकांनी मैत्रेय कंपनीच्या विविध योजनांमध्ये कोट्यवधी रुपये गुंतविल्यानंतर फ्रेब्रुवारी २०१६ मध्ये मैत्रेय कंपनी बंद करण्यात आली. मात्र, गरीब व कष्टकरी नागरिकांचे पैसे परत करण्यात आले नाहीत. या अन्यायाविरुद्ध राज्यभरात मोर्चे, आंदोलने करण्यात आली. मैत्रेयविरुद्ध मुंबई, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, परभणी, बीड, धुळे, नंदूरबार, वर्धा, ठाणे, पुणे ग्रामीण, शहर, जळगाव, सोलापूर, नाशिक ग्रामीण व नागपूर येथे गुन्हे दाखल आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मैत्रेय ग्राहक-प्रतिनिधी अन्य निवारण समितीच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक करा व गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत मिळावे, या मागण्या नागरिकांनी रेटून धरल्या होत्या. त्यांच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी प्रदीप चव्हाण, संजय चव्हाण, रमेश खेडकर, सागर देशमुख, ललिता आंबेकर, अनिता वानखडे, मीरा कुशवाह, अश्विनी श्रीवास, शंकर जामोदकर यांचा सहभाग होता. 

अमरावतीत ४० हजार नागरिकांची ४० कोटींनी फसवणूक मैत्रेयविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे ४० हजार नागरिकांनी तक्रारी नोंदविल्या असून त्यामध्ये ४० कोटींची फसवणूक झाल्याचे नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी वर्षा सत्पाळकर, हर्षद पाटील, प्रमोद डाखोरे, जनार्दन परोळेकर, नितीन चौधरी, विजय तावटे, लक्ष्मीकांत नारवेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी जनार्दन परोळेकरला परभणीतून अटक करून त्याची कसून चौकशी केली. तेव्हापासून तो मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरुद्धचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. अमरावती पोलिसांनी मैत्रेयची १२५ कोटींची स्थावर मालमत्ता उघड केली असून तो अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता. त्यानुसार या प्रकरणात सक्षम प्राधिकारी नियुक्ती करण्यात आले असून त्यांच्यामार्फत तो अहवाल मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.