संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यू या आजाराची धग जिल्ह्यात शमली नसतानाच आता स्क्रब टायफस या गवतातील कीटक चावल्याने होणाऱ्या आजाराने डोके वर काढले आहे. स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी जी रक्तचाचणी करण्यात येते, यामध्ये पॉझिटिव्ह व संशयित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५ सप्टेंबरपर्यंत १६ झाली असून, यापैकी पाच अतिगंभीर रुग्णांना यापुर्वीच नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.जिल्ह्यात स्क्रब टायफसचा पहिला रुग्ण हा १९ आॅगस्टला आढळून आला होता. त्यानंतर चार संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी तीन जणांना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले होते. दोन रुग्णांवर अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या आठवड्यात पुन्हा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामीण भागात स्क्रब टायफसचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांवर येथील पीडीएमसीत उपचार सुरू आहेत, तर दोन रुग्ण पुन्हा नागपूरला हलविण्यात आले.पीडीएमसीत आतापर्यंत स्क्रब टायफस या आजाराचे सहा रुग्ण दाखल झाले आहे. यामध्ये स्क्रब टायफससाठी जी प्राथमिक चाचणी करण्यात येते, यामध्ये तीन रुग्णांची ती रक्तचाचणी पॉझिटिव्ह आढळून आली, तर तीन रुग्णांना त्याच प्रकारे लक्षणे असल्याने त्यांच्यावर स्क्रब टायफसचा उपचार करण्यात आल्याची माहिती पीडीएमसीचे डीन डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी दिली. सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे व काही रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ग्रामीण भागात स्क्रब टायफसची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. बुधवारी येथील डॉ. पवन ककराणीया यांच्याकडे उपचारासाठी गेलेल्या दोन रुग्णांना स्क्रब टायफस हा आजार झाल्याचे आयजीएम फॉर स्क्रब टायफस या चाचणीत स्पष्ट झाले आहे. रुग्ण गरीब असल्याने इलायझा कन्फर्म ही चाचणी करण्यात आलेली नाही. पण, लक्षणे ही स्क्रब टायफसची असल्याने व कीटकाने चावा घेतल्याचे निशाण (इशर) आढळून आले. दोन्ही रुग्ण हे ६५ वर्षांवरील होते. यातील एक रुग्ण वरूड तालुक्यातील टेंभूरखेडा येथील असून, दुसरा रुग्ण हा मोर्शी तालुक्यातील घोडगव्हाण येथील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून, एका रुग्णाला दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आठवडाभरामध्ये डॉ. यादगिरे हॉस्पिटलमध्ये स्क्रब टायफसचे दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथील ७२ वर्षाची वृद्धा या ठिकाणी दाखल झाली होती. तिची इलायझा कन्फर्म ही चाचणी केल्यानंतर स्क्रब टायफस पॉझिटिव्ह असे निदान झाले होते. २ सप्टेंबर रोेजी अमरावती येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला उपचारासाठी दाखल झाली आहे. ती संशयितच असून, रॅपिड डायग्नोसिस करण्यात आल्याची माहिती डॉ. रोहिनी यादगिरे यांनी दिली. दोन्ही रुग्ण उपचार घेत असून, प्रकृती गंभीर आहे.स्थानिक डॉ. संदीप मलिये यांच्याकडे पूर्वी एक पीडीएमसीमधील रूग्ण आला होता. त्याला किडा चावल्याचे व स्क्रब टायफसची लक्षणे असल्याने उपचार करण्यात आला. हा रुग्ण चिंचोली मेटकर येथील होता. मंगळवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील ३५ वर्षीय तरुण उपचारासाठी दाखल झाला आहे. त्याची आयजीएम ही चाचणी पॉझिटिव्ह असल्याने व कीटक चावल्याचे निदर्शनास आल्याने त्याची रक्तचाचणी करून संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू केला आहे, अशी माहिती डॉ. संदीप मलीये यांनी दिले. पीडीएमसी व खासगी डॉक्टरांकडून घेतलेल्या माहितीनुसार, १६ रुग्ण स्क्रब टायफसबाधित आढळले आहेत.या भागात आढळून आले रुग्णकोठाडा (ता. नांदगाव खंडेश्वर) १, चांदूररेल्वे १, आमला विश्वेश्वर १, चिंचोली मेटकर (ता. अचलपूर) १, करजगाव (ता. चांदूरबाजार) १, वरूड १, बग्गी (ता. चांदूररेल्वे) १, अमरावती शहर १, मांगरूळी पेठ (ता. वरूड), टेंभुरखेडा (ता. वरूड) १, घोडगव्हाण (ता. मोर्शी) १. ग्रामीणमध्ये इतर भागातील रुग्ण आढळून आले.आमच्या हॉस्पिटलमध्ये दोन वृद्ध महिला उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी एका रुग्णाची इलायझा ही चाचणी पॉझिटिव्ह आहे. दुसरा रूग्ण संशयित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.डॉ. रोहिनी यादगिरेअतिदक्षता तज्ज्ञस्क्रब टायफसचे आतापर्यंत सहा रुग्ण दाखल झालेत. तीन रुग्णांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आहे. इतरांमध्येही लक्षणे दिसल्याने त्या दृष्टीने उपचार केले. सर्व रुग्ण बरे झाले. लोकांनी घाबरू नये.- डॉ. पद्माकर सोमवंशीडीन, पीडीएमसी, अमरावती.दोन रुग्णांची प्राथमिक लक्षणे डेंग्यूसारखीच आहेत. डेंग्यू टेस्ट निगेटिव्ह आली. स्क्रब टायफससाठीची चाचणी पॉझिटिव्ह आली. स्क्रब टायफसच्या अनुषंगाने उपचार सुरू आहेत.- डॉ. पवन ककराणीया,अमरावती.
स्क्रब टायफसचे जिल्ह्यात २१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 10:22 PM
डेंग्यू या आजाराची धग जिल्ह्यात शमली नसतानाच आता स्क्रब टायफस या गवतातील कीटक चावल्याने होणाऱ्या आजाराने डोके वर काढले आहे. स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी जी रक्तचाचणी करण्यात येते, यामध्ये पॉझिटिव्ह व संशयित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५ सप्टेंबरपर्यंत १६ झाली असून, यापैकी पाच अतिगंभीर रुग्णांना यापुर्वीच नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
ठळक मुद्देवाढता प्रकोप, सतर्कता गरजेची : पाच नागपूरला 'रेफर'