निवड समितीची बैठक : विभागीय आयुक्ताकडे प्रस्तावअमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागांर्तगत दरवर्षी ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. मात्र मागील वर्षी सदर पुरस्कार वितरित करण्यात आले नव्हते. अखेर सोमवारी दोनही वर्षांतील आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावाची निवड समितीने तपासणी करून एकूण २१ शिक्षकांना पुरस्कार वितरणावर शिक्कामोर्तब केले आहे. सदरचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी आदर्श शिक्षण वितरण सोहळा रखडल्यामुळे यंदाही ही परिस्थिती कायम राहणार का? यासंदर्भात 'लोकमत'ने शनिवारी वृत्त प्रकाशित करताच याची दखल घेऊन तातडीच्या बैठकीत हा प्रश्न निकाली काढण्यात आला.जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून १४ पंचायत समितीमध्ये उकृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी शिक्षण विभागाकडे सन २०१४-१५ या वर्षासाठी एकूण २२ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी प्राथमिक शिक्षण विभागातील १४ आणि १ माध्यमिक असे पंधरा आणि सन २०१५/१६ मध्ये केवळ सहा पंचायत समितीमधून १२ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. यापैकी सहा शिक्षकांना यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. या सर्व प्राप्त प्रस्तावांची जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, शिक्षण सभापती गिरीश कराळे, महिला व बांधकाम सभापती वृषाली विघे, समाज कल्याण सभापती सरिता मकेश्र्वर, डेप्युटी सिईओ सुनिल निकम, निवड समितीचे सदस्य सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी वाय .जी. बोलके, डायटचे अधिव्याख्याता व्ही. आर गावंडे आदींनी आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड केली आहे. (प्रतिनिधी)यंदा सहा जणांच पुरस्कारसन २०१५/१६ या वर्षासाठी केवळ सहा पंचायत समितीमधून १२ प्रस्ताव सादर करण्यात आली होते.यामध्ये अमरावती पंचायत समिती मधून एकून १, दर्यापूर मधील ५,चांदुर बाजार २, वरूड १, अजंनगाव सुर्जी २,चांदुर रेल्वे १ असे १२ प्रस्ताव प्राप्त झाली होते.यानुसार प्रत्येकी एक याप्राणे सहा शिक्षकांना यंदाचा आदसर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे माध्यमीक विभागासह इतर विभागात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एकही प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आला नाही.विभागीय आयुक्ताकडे प्रस्ताव जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती व पदाधिकारी तथा सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत आदर्श श्क्षिक पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावाची अंतिम पडताळणी व निवड प्रक्रीया आटोपल्यानंतर सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे शिक्षण विभागा मार्फत पाठविण्यात येणार आहे.या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर ५ सष्टेंबर रोजी पुरस्कार वितरण केले जाणार आहे. मागील वर्षातील १५ जणांना पुरस्कार जिल्हा परिषद शि़क्षण विभागाकडे मागील वर्षात एकूण २२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. मात्र पुरस्कार वितरण व निवड प्रक्रीया विहीत मुदतीत पुर्ण न झाल्याने अखेर यंदा मागील वर्षातीलही पुरस्कार वितरीत केले जाणार आहे.यामध्ये १४ तालुक्यातून प्रत्येकी एक आणी माध्यमीक विभागातून एक अशा १५ शिक्षकांना सन्मानित केले जाणार आहे.
२१ शिक्षकांना मिळणार आदर्श शिक्षक पुरस्कार
By admin | Published: September 01, 2015 12:13 AM