शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

वऱ्हाडातील २१ हजार पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:23 AM

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. ...

ठळक मुद्दे२८ प्रयोगशाळांमध्ये तपासणीरासायनिक, जैविक चाचण्यांमधून स्पष्ट

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ७६ हजार ४५३ पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात आली. यातून हा धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही नमुन्यांत फ्लोराईड हा धोकादायक घटक आढळला.पाण्यात विरघळलेले रासायनिक घटक आणि पाण्यात संचार करणारे सूक्ष्म जीवजंतू मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. या परिणामांना आळा घालण्यासाठी पाणी प्रदूषणाच्या स्त्रोतांची माहिती करून त्यावर उपाययोजना करणे अगत्याचे ठरते. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत रासायनिक ३१,७२४ व जैविक ४४,२३९ अशा एकूण ७६, ४५३ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.यामध्ये १३,८१६ रासायनिक व ७,३३१ जैैविक असे एकूण २१,१४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घेऊन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.रासायनिक व जैविक पृथ:करण कामात अचुकता व सातत्य असल्यामुळे येथील विभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला ‘राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रमाणपत्र’ (एनएबीएल) मानांकन प्राप्त आहे. अमरावती विभागात विभागस्तरावर १, जिल्हास्तर ५ व उपविभागस्तरावर २२ अशा एकूण २८ प्रयोगशाळांद्वारा पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

जिल्हानिहाय दूषित नमुन्यांची संख्याच् रासायनिक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात ७१२८ पैकी ४१७०, अकोला ४,०१६ पैकी २,०६१, यवतमाळ १५,१२८ पैकी ५,१२३, वाशिम १,५२८ पैकी ४५३ तर बुलडाणा जिल्ह्यात ३,८५४ पैकी २००९ नमुने पिण्यास अयोग्य आहेत. जैविक नमुन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात २,९७४ पैकी ३१८, अकोला ५,१४९ पैकी १,१९१, यवतमाळ १६,७८० पैकी ३,७७६, वाशिम १,४६९ पटकी २५०, तर बुलडाणा जिल्ह्यात ४,३३७ पैकी ६६० नमुने पिण्यास अयोग्य आढळते आहेत.

भूपृष्ठावरील पाणी, भूजल प्रदूषणांची कारणेच्प्रक्रिया न केलेले किंवा प्रक्रिया पूर्ण न झालेल्या औद्योगिक सांडपाण्याचा नदी-नाल्यात होणारा विसर्ग, शेती व्यवसायात वापरली जाणारे रासायनिक खते, आम्ल वर्षा, जमिनीत टाकण्यात येणारे टाकाऊ पदार्थ व भूगर्भात आढळून येणारी खनिजे पाण्यात विरघळल्याने भुपृष्ठावरील पाणी व भूजल प्रदूषित होत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Waterपाणी