अमरावती: दारू पिऊन भरधाव वाहन चालविणाऱ्या विरोधात शहर पोलिसानी ‘ ड्रंक ॲन्ड डाईव्ह’ची मोहीम गत तीन दिवस राबविली. त्यात २२ जणांवर आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला. मद्यपीची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या २२ मद्यपीवर कारवाई करण्यात आल्याचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) राहुल आठवले यांनी सांगितले.
२९ ते ३१ डिसेंबरपर्यंत ‘ड्रंक डाईव्ह’ मोहीम पोलीस आयुक्तलय हद्दीत वाहतूक पोलिसांनी राबविली तसेच प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. वाहतूक पोलिसानी मंगळवारी सात जणांवर केसेस केल्या, बुधवारी सर्वाधिक १५ तर गुरुवारी सकाळी एका जणांवर कारवाई करण्यात आली. ‘थर्टी फर्स्ट’च्या अनुषंगाने ४१ फिक्स पाईंट लावले होते. त्याकरीता हजारो पोलीस रस्त्यावर उतरले होते.
बॉक्स:
थर्टी फर्स्टला रात्री ११ पर्यंत हॉटेल बार सुरु ठेवण्यास मुभा होती.
शासनाने ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. मात्र पूर्वी रात्री १० वाजता पर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट , बारला परवानी होती. मात्र थर्टी फर्स्टला रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, बार खुले ठेवण्यास मुभा देण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. रात्रीच्या जमावबंदीचा आदेश सुद्धा लागू करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले. रात्री ११ वाजतानंतर बार हॉटेल सुरु राहिल्यास गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे सीपींनी सांगितले.