अमरावती : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती वनवृत्त स्तरावर २२ वनसंरक्षकाना वनपालपदी पदोन्नती मिळाली आहे. सीसीएफ प्रवीण चव्हाण यांनी २९ एप्रिल रोजी पदोन्नतीचे प्रशासकीय आदेश निर्गमित केेले आहे. वनपाल पदावर खुल्या संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती बहाल करण्यात आली आहे.
यात संजय जाधव (परतवाडा, सेमाडोह), गणेश मिसाळ (अकोला, विशेष शाखा), दीपक फुके (बुलडाणा सिंदखेड राजा), सतीश गिरगुने (चिखलदरा, मांगीया), सदानंद कोल्हे (बुलडाणा, चिखली), भगवान गवळी (बुलडाणा, देऊळगाव राजा), जानकीराम सोनोने (बुलडाणा, ईसवी), बाबूराव खैरकर (अमरावती, बडनेरा), आनंदा सपकाळ (बुलडाणा, मोताळा), विठ्ठल बकाल (परतवाडा, पोपटखेडा), होमवंत सोरते (अमरावती, माळेगाव), रामेश्र्वर अदमाने (अकोट, गोलाई), विजय चौधरी (अमरावती), नरेंद्र म्हसांगे (अमरावती, चांदूरबाजार), मोहनदास कळसकर (अमरावती), नीलेश सोनाेने (अकोला, बार्शी टाकळी), सामेश्र्वर घोडमारे (अमरावती, नांदगाव खंडेश्र्वर), संदीप राऊत (परतवाडा, पांढराकवडा), देवेंद्र लांबाडे (अमरावती, मोर्शी), लक्ष्मण दाढे (परतवाडा, माडीझडप), गजानन लांधे (परतवाडा, कोलकाज), नीतेश धुरे (परतवाडा, सुसर्दा) या वनसंरक्षकांना वनपालपदी पदोन्नती मिळाली आहे.