अमरावती : लॉकडाऊनमध्ये जिवनावश्यक वस्तु वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश असतांना पठाण चौक व आसपासच्या भागात सुरु असलेली २२ दुकाने सुरु असल्यामुळे बुधवारी सिल करण्यात आली. उपायुक्त रवि पवार यांच्या नेतृत्वात बाजार व परवाना विभाग, अतिक्रमण विभाग, झोन क्र.५ व नागपुरी गेट पोलिसामनी ही कार्यवाही केली.
नागरिकांसह, दुकानदारांनी नियमांचे पालन करावे. शासनाने ज्या दुकानदारांना दुकान उघडण्याची परवानगी दिली असेल त्यांनीच आपली दुकाने उघडावी. ज्यांना परवानगी नाही आहे ते सर्व दुकाने उघडी दिसल्यास ते सिल करण्यात येईल. नागरिकांनी मास्क चा वापर करावा, असे उपायुक्तांनी यावेळी सांगितले.
या कार्यवाहीमध्ये सहाय्यक आयुक्त तौसिफ काझी, पशुशल्य चिकीत्सक डॉ.सचिन बोंन्द्रे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अतिक्रमण विभाग प्रमुख अजय बन्सेले, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्हाण, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी संजय गंगात्रे, बाजार परवाना विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, पशु विभागाचे कर्मचारी, झोन क्र.५ चे कर्मचारी उपस्थित होते. नागपुरी गेट पोलीस कर्मचारी आदी सहभागी होते.
बॉक्स
या दुकांनावर कारवाई
बबलु मेन्स वेअर, लाला मेन्स वेअर, वली मेन इन ब्रॅंन्ड, पारेवाला अॅल्युमिनियम, ताज रेडीयम वर्क, सैलानी पान भंडार, दानिश टी स्टॉल, राज कॅफे, सरताज बेकरी, पटेल रबर स्टॅम्प, एम.के.हार्ड वेअर, झम झम मोबाईल, म्युजिक शॉप, स्टार सलून, जे.के. सिमेंट डेपो, मशिन क्लॉथ सेंटर, लुमन किड्स वेअर, ताज इलेक्ट्रिक अॅन्ड पाईप्स, सोनी शॉप, अक्श कुलर, पारस किराणा, नदीम कटपीस सेंटर हे दुकाने सुरु असल्यामुळे सिल करण्यात आली.