शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
3
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
4
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
5
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
6
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
7
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
8
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
9
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
10
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
11
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
12
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
13
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
14
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
15
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
16
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
17
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
18
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
19
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
20
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

वरुड तालुक्यात १५ वर्षांत २२२ शेतकरी आत्महत्या

By admin | Published: September 07, 2015 12:28 AM

विदर्भाच्या नकाशावर वरुड तालुक्याची ओळख सधन तालुका म्हणून असली तरी अलीकडच्या काळात नापिकी व निसर्गाच्या प्रकोपामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे

नापिकी, कर्जबाजारी : १६ महिला शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा संजय खासबागे  वरुडविदर्भाच्या नकाशावर वरुड तालुक्याची ओळख सधन तालुका म्हणून असली तरी अलीकडच्या काळात नापिकी व निसर्गाच्या प्रकोपामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. बँका, सावकारांच्या कर्जाची परतफेड होऊ शकत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे. १५ वर्षांत २२२ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आपली जीवनयात्रा संपविली आहे. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यात नर्सरी उत्पादकांची संख्या अधिक आहे. सततच्या दुष्काळामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मुलांच्या पालणपोषणासह शिक्षण आणि विवाहाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील हातुर्णा, सावंगा, टेंभूरखेडा, अमडापूर, आमनेर, आलोडा, इत्तमगाव, उदापूर, उराड, एकदरा, करजगाव, काचुर्णा, काटी, कुंभीखेडा, कुरळी, खडका, खानापूर, गाडेगाव, घोराड, चांदस, चिंचरगव्हाण, जरुड, जामगाव (खडका), टेंभूरखेडा, ढगा, तिवसाघाट, धनोडी, नांदगाव, नागझिरी, पंढरी, पळसोना, पवनी, पांढरघाटी, पिंपळखुटा, पुसला, पेठ मांगरुळी, फत्तेपूर, बहादा, बेनोडा, बेसखेडा, भापकी, भेमडी, मलकापूर, मांगोना, मिलनपूर, मुसळखेडा, मोरचूंद, मोर्शीखुर्द, रवाळा, बारगांव, आलोडा, खडका, राजुराबाजार, लिंगा, लोणी, खानापूर, वंडली, वडाळा, वरुड, वाठोडा, वाडेगाव, वावरुळी, वेडापूर, शेंदूरजनाघाट, सावंगा, सुरळी, सावंगी या गावांचा समावेश आहे. या गावांमधून वरुड, लोणी, शेंदूरजनाघाट येथील शेतकऱ्यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपविली. १ जानेवारी २००१ ते ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत तब्बल २२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ याला शेतकरी कंटाळला असून दुबार , तिबार पेरणी करुनही शेतीने साथ दिली नाही तर उत्पादनात कमालीची घट झाली. परंतु हमी भाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्च काढणेही दुरापास्त झाले. दुष्काळ ग्रस्त परिस्थितीत तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा गळाला. यामुळ मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली. केवळ शेतीवर असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. मुला-मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण आणि कुटुबांचे पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला तर बँकांचे कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे द्यायचे की गहाणातील जमिनी सावकारालाच द्यायच्या, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. शासनादेश असतानाही कर्जाचे पुनर्गठन होत नसल्याने शेतकरी व्दिधा मन:स्थितीत आहेत.कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय ? तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँका वसुलीचा तगादा आणि पोलिसी खाक्या दाखविला जात आहे. स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरापुढे बँका पोलीस आणि कर्जवसुली पथक मानहाणी करतात. न्यायालयीन प्रकरणे दाखल करुन शेतकऱ्यांना कोर्टात खेचले जात असल्याने शेतकऱ्याला आत्महत्येचा मार्ग निवडावा लागत आहे. फायनान्स कंपन्यांची दंडुकेशाही कारणीभूत शेतकऱ्यांना बँकेने कर्ज नाकारले किंवा कृषी कर्ज घेतल्यांनतर मुलांच्या शिक्षणाकरिता काही अडचणी आल्यास घरबांधणीच्या नावावर फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले जाते. कर्ज परत करताना विलंब झाल्यास फायनान्स कंपन्या विशेष वसुली पथक नेमून दंडूकेशाहीच्या मार्गाने रात्री बेरात्री कर्जदार शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे शेतकरी आत्महत्या झाल्यात. यामध्ये खानापूरच्या शिवहरी ढोक यांना अशाच प्रकारे त्रास दिला जात होता. यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती आहे.