जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरु झाली व जूनअखेरला आलेख ओसरला. या कालावधीत उच्चांकी ७२,७६९ कोरोनाग्रस्तांची नोंद व १,२५३ कोरोनाग्रस्तांचे उपचारादरम्यान मृत्यू झालेले आहे. जिल्ह्यात ४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या संक्रमिताची नोंद झाली. त्यानंतर संसर्ग वाढायला. सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट आली. यामध्ये ७,७१३ संक्रमितांची नोंद झाली व १५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला होता.
जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा विषाणूमध्ये संक्रमनशक्ती अधिक असल्याने दुसऱ्या लाटेत रुग्णालय आणि बेड कमी पडले. याच काळात ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची देखील बोंबाबोंब झाली. त्यानंतर प्रमुख रुग्णालयात ऑक्सिजन युनीट लावण्यात आले व प्रत्येक रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आलेली आहे. आता कोरोनाचे नवे म्युटेशन डेल्टा प्लस व्हेरिएंट आलेले आहे. याची संक्रमनशक्ती अधिक असल्याने तिसरी लाटेची तयारी आरोग्य विभागाद्वारा सुरु करण्यात आलेली आहे.
बॉक्स
१९ जुलैपासून कोरोना मृत्यू नाही
जुलै महिन्यात फक्त आठ कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झालेले आहे. याव्यतिरिक्त १९ जुलैपासून जिल्ह्यात एकाही संक्रमिताचा मृत्यू झालेला नाही. या महिन्यात २, ३, ६, ७, ८, १३,१४, १७ व १८ यादिवशी प्रत्त्येकी एका संक्रमिताचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आता तर संक्रमितांची नोंद २० च्या आता व पॉझिटिव्हिटी ही०.५० टक्क्यांच्या आत असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
जुलैमध्ये ०.६३ टक्के पॉझिटिव्हिटी
जिल्ह्यात जुलै महिन्यात ७५,४२३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४७८ पॉझिटिव्हची नोंद झालेली आहे. ही पॉझिटिव्हीटी आतापर्यतची सर्वात कमी ०.६३ टक्के पॉझिटिव्हची नोंद झालेली आहे. सध्या जिल्हा दुसऱ्या स्थरात आहे. त्यामुळे दोन दिवसांत संचारबंदीमध्ये सुट मिळण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
कोट
जिल्ह्यास लागू असलेल्या निर्बंधात सुट देण्याबाबत अद्याप शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. आल्यानंतर आवश्यक ते निर्बंध कमी केल्या जातील
पवनीत कौर
जिल्हाधिकारी
पाईंंटर
महिना पॉझिटिव्ह मृत्यू
जानेवारी २२१९ २२
फेब्रुवारी १३,२३० ९२
मार्च १३,५१८ १६४
एप्रिल १६,६९४ ४१०
मे २५,७६९ ४९५
जून ३,५५८ ९२
जुलै ४७८ ०८