जिल्हा परिषदेच्या ताफ्यात दाखल
अमरावती : मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दिमतीला २३ लाख रुपयांचे वाहन नुकतेच उपलब्ध झाले आहे. सदर वाहन खरेदीसाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता देताच नवे वाहन झेडपीच्या ताफ्यात दाखल झाले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीचे सभापती आदींच्या दिमतीला शासकीय वाहन पुरविले जाते. याकरिता जिल्हा परिषदेच्या घसारा निधीत आर्थिक तरतूद केली जाते. या निधीतून नवीन वाहन खरेदी करता येते. त्यानुसार जिल्हा परिषदेतील अनेक वाहन नादुरुस्त झाले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे यापूर्वी एम.एच. २७ बीव्ही ९७५५ क्रमांकाची कार काही वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आली होती. सदर वाहन वित्त व आरोग्य सभापतींना देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून नव्याने खरेदी केलेले २३ लाखांचे नवीन वाहन झेडपी अध्यक्षांना उपलब्ध करून दिले आहे.