शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

कर्जमाफीच्या वर्षपूर्तीत २३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 7:53 PM

आर्थिक अडचणीतील शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, वर्षपूर्तीच्या कालावधीत अटी-शर्र्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही.

- गजानन मोहोड अमरावती - आर्थिक अडचणीतील शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, वर्षपूर्तीच्या कालावधीत अटी-शर्र्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. या वर्षभरात २३०  शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला. जिल्ह्यात दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुलामुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; मात्र या वर्षभराच्या कालावधीत दर तीस तासांत शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात २७ जून २०१८ पर्यंत ३ हजार ४३२  शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ४२८ प्रकरणे पात्र, १ हजार ९४० अपात्र, तर ६४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. गेल्या १७ वर्षांचा आढावा घेता, सर्वाधिक ३२३ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या आहेत. जानेवारी महिन्यात २६७, फेब्रुवारी २९०, मार्च ३०४, एप्रिल २४८, मे ३००, जून २६७, जुलै २६४, सप्टेंबर ३२४, आॅक्टोबर ३१५, नोव्हेंबर २८५ व डिसेंबर महिन्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासन नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. 

 कर्जमाफीच्या काळातील शेतकरी आत्महत्याशासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा २२ जून २०१७ ला केली व प्रत्यक्षात पहिला शासनादेश २८ जून २०१८ ला जाहीर झाला. या वर्षभरात २३० शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये जून २०१७ मध्ये २१, जुलै २५, आॅगस्ट २९, सप्टेंबर ३२, आॅक्टोबर ३२, नोव्हेंबर १३, डिसेंबर २५, जानेवारी २०१८ मध्ये २३, फेब्रुवारी २०, मार्च २६, एप्रिल १३, मे १४ व २७ जूनपर्यत १० शेतकºयांनी मृत्यूचा फास आवळला आहे.

बळीराजा चेतना अभियान केव्हा?राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्र्थिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात  पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असताना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.

 शेतकरी स्वावलंबी मिशन कुचकामीराज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाºया १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगस्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. शासनाने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला; मात्र शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्याMaharashtraमहाराष्ट्र