शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

राज्यात २३० वनपालांना पदोन्नतीची प्रतीक्षा, शासनाचे मागविले सीआर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 6:25 PM

येत्या जुलै अखेरपर्यंत ११९ वनपालांना बढतीचे संकेत मिळाले आहेत.

- गणेश वासनिक

अमरावती : दीड वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या २३० वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बढती देण्याचा निर्णय अखेर वनविभागाने घेतला आहे. येत्या जुलै अखेरपर्यंत ११९ वनपालांना बढतीचे संकेत मिळाले आहेत.

राज्यातील वनविभागात आयएफएस लॉबीला विनाविलंब पदोन्नती देण्यासाठी वरिष्ठ वनाधिकारी तत्पर असतात. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपालांना राज्यस्तरावर बढती देण्यासाठी वेळकाढू धोरण आखले जाते. गतवर्षी ७५ वनपरिक्षेत्र अधिका-यांना सहायक वनसंरक्षक या पदावर बढती देण्यासाठी दोन वेळेस विभागीय बढती समितीच्या बैठकी झाल्यात. मात्र, ७५ वनपरिक्षेत्र अधिका-यांना मे २०१९ मध्ये बढती देण्यात आली. सध्या राज्यात वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या ११९ च्या वर पदे रिक्त असतानासुद्धा वनविभागाने गतवर्षीपासून पदोन्नती समितीची बैठक आयोजित केली नाही.

क्षेत्रीय वनाधिकारी पदे रिक्त ठेवल्याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनप्रमुखांना तंबी दिल्याची माहिती आहे. ३३ कोटी वृक्षलागवडीचे दिव्य पार पाडत असताना क्षेत्रीय कर्मचाºयांची पदे पदोन्नतीने त्वरीत भरण्याबाबत सूचना दिल्या. परिणामी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वनपालांना बढती देऊन ११९ वनपरिक्षेत्र अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाला मंजुरी मागितली आहे. शासन मंजुरी देणार असल्याने ही पदे वनपालांना पदोन्नती देऊन तात्काळ भरण्यात येणार आहेत.

११९ वनपालांना बढतीचे संकेतराज्यात वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर बढती देण्यासाठी २३० वनपालांची यादी सेवाज्येष्ठतेनुसार घोषित केलेली आहे. यामध्ये ११९ वनपालांना बढती मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही पदे भरताना पाच वर्षांचे गोपनीय अहवाल, मराठी व हिंदी भाषा उत्तीर्ण तसेच विभागीय चौकशी, गुन्हे या बाबी तपासून पदोन्नती देण्याचा निर्णय वनविभाग घेणार आहे. जवळपास २२ वनपालांवर गंभीर स्वरूपाच्या चौकशी सुरू असल्याने त्यांना तूर्तास पदोन्नती मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. हे २२ वनपाल वगळून आरएफओ पदोन्नती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

गोपनीय अहवालाची पडताळणीवनपालांच्या पदोन्नतीचे वेध लागले असताना, संबंधित विभागाकडून त्यांचे पाच वर्षाचे गोपनीय अहवाल मागविले जात आहेत. संबंधित वनविभागाचे कार्यालय वनपालांचे सीआर शोधत असल्याने वनपालांच्या पदोन्नतीला विलंब होत आहे.

पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या वनपालांचे गोपनीय अहवाल तपासले जात आहे. त्यानुसार वरिष्ठांकडे आरएफओ पदी बढती मिळण्यासाठी वनपालांची यादी पाठविली जाणार आहे. विभागीय चौकशी सुरू असलेल्या वनपालांना यातून वगळले जाईल.    - प्रवीण चव्हाण,    मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक अमरावती

टॅग्स :forest departmentवनविभाग