शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

लाभापूर्वीच कपाशी, धानाच्या मदतनिधीत २३२ कोटींची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 3:42 PM

शेतकऱ्यांच्या मदतनिधीत ४८ तासांत दोन शासनादेश जारी करून शासनाने घूमजाव केला व शेतकऱ्यांच्या २३२.३० कोटींच्या मदतनिधीला फाटा दिला असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात दोन शासनादेशपहिल्या टप्प्यात १,१६१ ऐवजी ९२९ कोटी वितरित

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात बाधित कपाशी व धान पिकांना ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ३,४८४.६० कोटींची मदत समान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय ८ मे रोजी शासनाने घेतला. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी १,१६१.६३ कोटींचा पहिला टप्पा देय असताना, ९ मे रोजी ९२९.२३ कोटी रुपये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केले. शेतकऱ्यांच्या मदतनिधीत ४८ तासांत दोन शासनादेश जारी करून शासनाने घूमजाव केला व शेतकऱ्यांच्या २३२.३० कोटींच्या मदतनिधीला फाटा दिला असल्याचे वास्तव आहे.गतवर्षीच्या खरिपामध्ये कपाशीवर बोंडअळी व धान पिकांचे तुडतुड्यांमुळे मोठ्या प्रमाणात झाले. यामध्ये ३३ टक्क्यांवर बाधित क्षेत्राला ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने १७ मार्च २०१८ रोजी घेतला. राज्यात बाधित कपाशीला ३,२४६.७७ व धानासाठी २३७.८३ कोटी अशी एकूण ३,४८४.६० कोटींच्या निधीची आवश्यकता असताना, या मदतनिधीचे तीन समान टप्पात वाटप करण्यास ८ मे २०१८ च्या शासनाने मान्यता दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ मे रोजी तीन समान टप्प्यांपैकी पहिला टप्पा १,१६१ कोटींचा देय असताना ९२९ कोटी रुपये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केले. एकंदर तीन दिवसांचा घटनाक्रम पाहता, शासनाने शेतकऱ्यांच्या मदतनिधीत शब्दच्छल करीत घूमजाव केला आहे.जिल्हानिहाय उपलब्ध निधीमहसूल विभागाच्या १० मेच्या शासनादेशानुसार नागपूर जिल्ह्यास १८.७४ कोटी, भंडारा १८.११, गोंदिया ११.०७, वर्धा ४१.०१, चंद्रपूर ४७.२१, गडचिरोली ९.२०, अमरावती ४८.७०, अकोला ३६.१४, यवतमाळ ९३.११, बुलडाणा ३५.८२, वाशिम ४.११, औरंगाबाद ७९, बीड ६८.४२, जालना ७३.४३, नांदेड ४६.९७, लातूर २३०, परभणी ४२.१२, हिंगोली ९.७६, उस्मानाबाद ३.६०, नाशिक ७.०२, धुळे ५४.१६, नंदुरबार २३.९०, अहमदनगर ३३.३९, जळगाव ११८.१९, पुणे ०.१, सोलापूर ०.८५ व पालघर जिल्ह्यास २.७८ कोटी उपलब्ध करण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी