- गणेश वासनिकअमरावती - वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. तरीही वाहनचालक पाहिजे त्या प्रमाणात वाहन चालविण्याबाबत व वाहनाचे विधीग्राह्य कागदपत्रे जवळ न बाळगता मोटार वाहन कायदा व नियमाचे सर्रास उल्लंघन करतात. त्यानुसार जून महिन्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीवरून २,३५० वाहन चालकांनी मोटार वाहन कायदा व नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.जून महिन्यात २,३५० वाहन चालकांकडून दंडात्मक कारवाईत एकूण रुपये ३७ लाख ६७ हजार दंड स्वरुपात रक्कम वसूल करण्यात आली आहे.
समुपदेशन केल्यानंतर वाहनचालक परत परत मोटार वाहन कायदा / नियमाचा भंग करत असतील तर त्यांना न्यायालयीन व दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागते. प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक हितेश धावडा, दिनेश सुरडकर, गणेश वरुटे व प्रताप राऊत यांनी ही कारवाई केली.
...असे केले वाहन चालकांनी या नियमांचे उल्लंघन१) हेल्मेट -६३१२) वाहनाला परावर्तीत टेप न लावलेली वाहने -११२३) वाहनाच्या छतावरून सामान वाहून नेणारी वाहने -१४) ओव्हर डायमेन्शन वाहने -१०५) शाळेत मुलांना घेऊन जाणारी वाहने- ४६) हॉर्न / सायरनचे उल्लंघन करणारी वाहने- ३७) वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणारे वाहन चालक -१८८) वाहन चालविताना लायसन जवळ न बाळगणारे वाहनचालक - ४२००९) चालकांचे लायसन / अनुज्ञप्ती विधीग्राह्यता संपलेले वाहनचालक-३०१०) वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने - ११११) फिटनेस प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता संपलेली वाहने-१९३१२) विमा प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने -६८१३) विमा प्रमाणपत्राची मुदत संपलेली वाहने - १५३१४) वाहनाचे परमिट सादर न केलेली वाहने -०८१५) परमिटची विधीग्राह्यता संपलेले वाहने -२२१६) भार क्षमतेपेक्षा अधिक मालवाहून नेणारी वाहने-१२१७) पीयूसी प्रमाणपत्र सादर न केलेली वाहने- ६०१८) पीयुसीची विधी ग्राह्यता संपलेली वाहने - १६९१९) वाहनांच्या नंबर प्लेटवर वाहन क्रमांक नसलेली वाहने-१२३२०) वाहनाची कागदपत्रे सादर न केल्याने अटकावून ठेवलेली वाहने - १२२१) इतर नियमांचा भंग / उल्लंघन केलेली वाहने-२९०