प्रदूषणमुक्ती अभियान : संत निरंकारी मिशनचा उपक्रमअमरावती : बडनेरा, अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर गुरुवारी संत निरंकारी मिशनतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये निरंकारी मंडळाचे २३७ भाविक पुरुषांसह महिला-मुलींनी हिरीरिने सहभाग घेतला. संत निरंकारी मिशनचे आद्य प्रमुख बाबा हरदेवजी महाराज यांच्या जयंतीप्रीत्यर्थ २३ फेब्रुवारी रोजी देशभरातील रेल्वे स्टेशनवर स्वच्छता राबविण्यात आले. संत निरंकारी मिशनच्या प्रमुख माता सविंदर हरदेवजी यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी अमरावती, बडनेरासह देशभरातील २०० रेल्वे स्टेशनची साफसफाईचा संकल्प करण्यात आला होता. संत निरंकारी मिशनचे आद्य प्रमुख स्व. बाबा हरदेव महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीने देशभरातील रेल्वे स्टेशनची सेवादार व संत निरंकारी फाऊंडेशनच्या स्वयंकांतर्फे सफाई व उद्यानांची स्वच्छता करण्यात येते. सेवादारांसह महिला सेवक व स्वयंसेवकांतर्फे सकाळी ८ वाजता स्वयंशिस्तीत एकसमान ड्रेस परिधान करून रेल्वे स्टेशनची साफसफाई करण्यात आली. ९.३० वाजेपर्यंत येथील रेल्वे स्टेशनची सफाई आटोपल्यानंतर सेवादार बबलू, भानू, सतीश पटेल आदींच्यावतीने चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर येथील काही सेवादार बडनेरा रेल्वे स्टेशनवर पोहोचले. त्यापूर्वी काही सेवादार बडनेरा स्टेशनवर सकाळी ८ वाजतापासून सेवेत उपस्थित होते. निळ्या रंगाची टी-शर्ट व काळी पँट परिधान करून सर्व सेवादार व सिव्हील ड्रेसमध्ये महिला-मुलींनी सफाई अभियानात सहभाग दर्शविला. या अभियानात संत निरंकारी मिशनचे जिल्हा संयोजक महेश पिंजानी, प्रचारक किशन बोधानी, देवीदास गेडाम, अशोक मेघानी, रवी बजाज, मुकेश मेघानी, श्याम वाडवानी, किशोर चौरसिया, माधव पिंजानी, आनंद टेंडवानी, दीपक शादी, सुदेश दालवानी, रोहित दालवानी, सचिन सचदेव, दीपाली मेघानी, मोहित पिंजानी, मुकेश खेमानी, पंकज खत्री, रोहन जगमलानी, चिराग डिंगरा, प्रिया सतवानी, रिया सिरवानी, सरिता मेघानी,चंदा देवानी, डॉली मनोजा, मोनिका दालवानी, कोमल धामेचा, रोशनी छुटलानी, सुनीता पिंजानी, कृतिका पिंजानी यांच्यासह संत निरंकारी मिशनच्या २३७ भाविकांनी स्वयंस्फूर्तीने उत्साहात सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)
२३७ भाविकांनी केली रेल्वे स्टेशनची स्वच्छता
By admin | Published: February 25, 2017 12:13 AM