शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

२४ हजार शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:15 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. प्रत्यक्षात खरेदीदार यंत्रणेची मंदगती, बारदाना, गोदाम नाही आदी कारणांमुळे बहुतेक दिवशी केंद्र बंद राहिली. सद्यस्थितीत चार केंद्रावरील खरेदी बंदच आहे. अशा स्थितीत १३ जूनला केंद्रांची मुदतवाढ संपुष्टात आल्याने आॅनलाइन नोंदणी केलेल्या २३ हजार ७९२ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.जिल्ह्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात १२ ...

ठळक मुद्देहरभरा खरेदी केंद्र बंद : खरेदीदार यंत्रणेने लावली वाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. प्रत्यक्षात खरेदीदार यंत्रणेची मंदगती, बारदाना, गोदाम नाही आदी कारणांमुळे बहुतेक दिवशी केंद्र बंद राहिली. सद्यस्थितीत चार केंद्रावरील खरेदी बंदच आहे. अशा स्थितीत १३ जूनला केंद्रांची मुदतवाढ संपुष्टात आल्याने आॅनलाइन नोंदणी केलेल्या २३ हजार ७९२ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.जिल्ह्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात १२ केंद्राद्वारे हरभºयाची खरेदी सुरू झाली. सद्यस्थितीत ३५ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. यापैकी ११ हजार ७६३ शेतकºयांचा १.९१ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अद्याप २२ हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करायचा आहे. शासनाने ६ जुन रोजी सर्व केंद्रांना १३ जूनपर्यत मुदतवाढ दिल्याचे पत्र दिले. प्रत्यक्षात केंद्र सुरू करण्याला ८ जून उघडला. त्या ठिकाणी बारदाना व गोदामाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात असे झालेच नाही. मात्र, यंत्रणेद्वारा खरेदीचा वेगच नसल्याने दररोज जवळपास २०० शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यातच आलेला नाही हे वास्तव आहे. मुदतवाढीनंतर अनेक केंद्र बंद असतांना खरेदीची अखेरची मुदत देखील बुधवारी उशिरा संपणार आहे. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या किमान २४ हजार शेतकरी केंद्रांना मुदतवाढ येईल, या प्रतीक्षेत आहेत.अशी आहे हरभऱ्याची खरेदीअचलपूर केंद्रावर १२१८ शेतकऱ्यांचा १८१०३ क्विंटल, अमरावती ६०९ शेतकऱ्यांचा १११३५, अंजनगाव सुर्जी १०१६ शेतकऱ्यांचा १७,०४६, चांदूररेल्वे ८५३ शेतकऱ्यांचा १३६२७, चांदूर बाजार १२२५ शेतकऱ्यांचा २२६८३, दर्यापूर २,२३३ शेतकऱ्यांचा ३९,७९९, धारणी ३८६ शेतकऱ्यांचा ६,९०७, नांदगाव खंडेश्वर ३०५ शेतकऱ्यांचा ४,९७६, नांदगाव खंडेश्वर ३०२ शेतकºयांचा ४,९३७, तिवसा ५९० शेतकऱ्यांचा ९,३५३, धामणगाव रेल्वे, मोर्शी ७७३ शेतकऱ्यांचा १२,२४९ व वरूड तालुक्यात ८१५ शेतकऱ्यांचा १०,०३८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.