शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

मेळघाटातील २४ पाड्यांमध्ये आजही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:30 AM

जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही.

ठळक मुद्देव्यथा शापित मेळघाटचीआदिवासींच्या पिढ्यांच्या नशिबी अंधार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. नातू-पणतूही रात्रीचा अंधार झेलत आहेत. आयुष्यातला काळोख केव्हा दूर होणार, हे सांगणे कठीण असल्याचे मत अतिदुर्गम चुनखडी येथील गानू बेठेकर या ६५ वर्षीय वृद्धाने व्यक्त करीत आपल्या व्यथा सांगितल्या.देश जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत असताना, धारणी व चिखलदरा तालुक्याचा समावेश असलेल्या मेळघाटातील २४ आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याची ७२ वर्षे उलटल्यानंतरही वीज पोहोचलेली नाही.धारणी व चिखलदरा तालुक्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या योजना शासनस्तरावरून पाठविल्या जातात. मात्र, वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा कुठपर्यंत पोहोचल्या, तर अजूनही २४ गावांमध्ये विजेची व्यवस्था झालेली नाही. धारणी तालुक्यातील रंगूबेली, ढोकळा, खामदा, किन्हीखेडा व कुंड या पाच गावांसह चिखलदरा तालुक्यातील एकताई, सलीता, भांडुम, चोबिता, लाखेवाडा, बोदू, मारिता, खडीमल, बिच्छुखेडा, चुनखडी, माडीझडप, नवलगाव, माखला, पिपल्या, टेंभ्रू, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा आदी गावांचा समावेश आहे. वीजपुरवठा हा येथील आदिवासींसाठी परवलीचा शब्द बनला आहे.कंदील, बॅटरी आणि सौरदिवाव्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने मेळघाटातील या अतिदुर्गम गावांना कोअर झोन आणि विविध कारणास्तव विद्युत पुरवठा पोहोचला नाही. शेतात जागली तसेच मुलांचा अभ्यास पूर्वी कंदील व बॅटरीच्या उजेडात व्हायचा. आता काही प्रमाणात सौरदिवे खरेदी करून त्यांनी वापरात आणले आहेत.शासनदरबारी उदासीनताचिखलदरा तालुक्यातील एकताई, सुमिता, सलीता, भांडुम, चोबिता व लाखेवाडा या सहा गावांमध्ये डीपीडीसी अंतर्गत प्रस्तावित वीजपुरवठ्याची कामे अडकून पडली आहे. माडीझडप, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा ही पाच गावे व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात येतात. हातरूण येथील उपसरपंच नानकराम ठाकरे, चिलाटी येथील मेळघाट मित्र या स्वयंसेवी संघटनेचे रामेश्वर फडसह आदिवासी युवकांनी महावितरणला निवेदन ते निवडणुकांवर बहिष्कारापर्यंत अनेक आंदोलने केली. मात्र, काळोख कायम आहे.४२ गावांना मध्य प्रदेशातून पुरवठा, लाखोंचा घाटाचिखलदरा तालुक्यातील सरिता सबस्टेशन अंतर्गत ४२ गावांना मध्य प्रदेशातून विद्युत पुरवठा केला जातो. पूर्वी येथे ३८०० विद्युत ग्राहक होते; आता केवळ १३०० ग्राहक आहेत. महावितरण एक कोटी रुपये महिन्याची वीज विकत घेते, तर केवळ तीन लाखांपर्यंत वसुली होत असल्याने लाखो रुपये घाट्याचे वास्तव आहे. वीजचोरी करताना अपघात होऊन आदिवासींना जीव गमवावा लागत आहे

टॅग्स :electricityवीज