परतवाडा : फरमानपुरा, अचलपूर यांच्या राहते घरात गांजाबाबत घरझडती घेतली असता, एका पॉलीथीनमध्ये २ किलो ४०० ग्रॅम गांजा (किंमत २४ हजार रुपये) मिळून आला. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम २०, २२, २७ एनडीपीएस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अबदागिरे व अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि राजेश भालेराव, पोहेका सिध्दार्थ वानखडे, नापोका पुरुषोत्तम बावनेर, विशाल थोरात, अंमलदार विलास सोनवणे, शेख मुजफर, श्रीगणेश झारखंडे, वैशाली कलाने, नायाब तहसिलदार शंकर श्रीराव यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
===Photopath===
240621\img-20210624-wa0034.jpg
===Caption===
अचलपूर शहरातून दोन किलो चारशे ग्राम गांजा जप्त