लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेल्या प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी आयोगाच्या मान्यतेने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंगळवारी जाहीर करतील. जिल्ह्यात सद्यस्थितीत २४,५४,८४८ मतदार आहेत. यामध्ये लोकसभेच्या तुलनेत ५५,५६५ मतदारसंख्येची भर पडली आहे.
राज्य निवडणूक आयोगाद्वारा विधानसभा निवडणुकीची लगबग सध्या सुरू आहे. एकही पात्र वंचित राहू नये, यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. त्यामुळे मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. शिवाय २७ व २८ जुलै तसेच ३ व ४ ऑगस्टला मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विशेष शिबिर घेण्यात आलेले आहे. यामध्ये नावात दुरुस्तीसह नवमतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
प्रारूप मतदारयादी ६ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या यादीवर २० ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविण्यात येईल व यावर २९ तारखेपपर्यंत सुनावणी होईल व विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. जिल्ह्यात २३ जानेवारी २०२४ ला २३,९९,२८३ मतदार होते. त्यानंतर ४ एप्रिल २०२४ ला २४,२५,००४ व आता ५ ऑगस्टला २४५४८४८ मतदारसंख्या झालेली आहे.
६२३८ ने स्त्री मतदार जास्तविधानसभेसाठी ५५,५६५ मतदार लोकसभेच्या तुलनेत वाढले आहे. यामध्ये २४६६० पुरुष व ३०८९८ महिला मतदार आहेत. यामध्ये ६२३८ स्त्री मतदारसंख्या जास्त आहे. वाढलेल्या मतदारांमध्ये धामणगाव मतदारसंघात ३२४३, बडनेरा १०२६४, अमरावती १८६०६, तिवसा ४६६२, दर्यापूर ४३५४, मेळघाट ५३३४, अचलपूर ४३३४ व मोर्शीमध्ये ४७६८ मतदार वाढले आहेत.
आठ विधानसभा मतदारसंघांतील मतदारमतदारसंघ पुरुष स्त्री इतर एकूणधामणगाव १५७१९२ १५१९६५ ०२ ३०९१५९बडनेरा १७५१४९ १६९७९२ ४३ ३४४९८४अमरावती १८१८०४ १७५४३७ २६ ३५७२६७तिवसा १४७४४६ १३९१२२ ०२ २८६५७०दर्यापूर १५५९६९ १४५७७६ ०४ ३०१७४९मेळघाट ४९९६२ १३९११४ १० २८९०८६अचलपूर १४५४४३ १३७३२८ ०५ २८२७७६मोर्शी १४६२२० १३७०३६ ०१ २८३२५७ एकूण १२५९१८५ ११९५५७० ९३ २४५४८४८