अमरावती : आयकर विभागाने अमरावती शहरातील उद्योगपती, बिल्डर व व्यापा-यांचे घर व कार्यालयाच्या झडती घेऊन तब्बल अडीच कोटींची रोख व दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयकर विभागाच्या अधिकाºयांनी काही जणांचे लॉकर सील केले असून, मोठ्या प्रमाणात दस्तऐवज जप्त केले आहेत. या धाडसत्राने शहरातील व्यापारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. अमरावती येथील व्यापारी, उद्योजक व बिल्डरांच्या आर्थिक व्यवहारावर आयकर विभाग दोन वर्षांपासून पाळत ठेवून होते. त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केल्यानंतर आयकर विभागाने अमरावतीत धाडसत्र राबविले. आयकर विभागाचे उपसंचालक अभय नन्नावरे व सहसंचालक एसपीजी मुदलीयार यांच्या नेतृत्वातील मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, चंद्रपूर व अमरावती येथील २५ पथकांच्या ३० वाहनांद्वारे बुधवारी बिल्डर प्रवीण मालू, तलडा बंधू, पनपालिया बंधू, अशोक सोनी, कैलास गिरूळकर, संजय बत्रा यांच्या घरांसह कार्यालयांवर छापे मारले. आयकर अधिका-यांनी आयकार्ड व वॉरंट दाखवून त्यांच्या संपत्तीविषयी दस्तऐवजांची तपासणी केली. त्यानंतर आयकर अधिकाºयांनी बिल्डर, उद्योजक व व्यापा-यांचे बयाण नोंदविले. दोन दिवस चाललेल्या या कारवाईत आयकर अधिकाºयांनी बिल्डर, व्यापारी व उद्योजकांविरुद्धचे पुरावे गोळा केले. आयकर अधिका-यांनी लॅपटॉप, मोबाईलचा बॅकअॅप घेऊन ३० हार्डडिस्क जप्त केल्या. बिल्डरांकडून इसारचिठ्ठी, उद्योजक व व्यापा-यांकडून कच्चा व पक्का मालाच्या खरेदींची बिले, न्युज पेपर, ट्रान्सपोर्ट बिल, अशाप्रकारचे दस्तऐवज जप्त केले. हे सर्व दस्तऐवज व्हेरीफाय केल्यानंतर बिल्डर, व्यापारी व उद्योजकांनी किती आयकर बुडविला, ही बाब उघड होणार आहे. त्यानंतर त्यांना तितक्याप्रमाणे आयकर भरावा लागणार आहे.
जप्त दस्तऐवजांनी भरले तीन वाहने आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी या धाडसत्रादरम्यान बिल्डर, व्यापारी व उद्योजकांच्या घर व कार्यालयातून जप्त केलेले दस्ताऐवजांनी तीन वाहने भरली.
अजुनही काही लॉकर उघडणे बाकीचआयकर विभागाने बिल्डर, उद्योजक व व्यापा-यांचे दहा ते बारा लॉकर सील केले. त्यापैकी केवळ तीन लॉकर उघडण्यात आले आहेत. त्यामध्येच हे दागिने व महत्त्वाचे दस्तऐवज आढळले आहे. यातील अन्य लॉकरसुद्धा उघडले जाणार असून, त्यानंतर बिल्डर, उद्योजक व व्यापाºयांच्या लॉकरमधील संपत्तीचा लेखाजोखा उघड होईल.
आरबीआयमध्ये जमा झाली रोखजप्त केलेली अडीच कोटींची रोख वाहनांद्वारे नागपूरला नेणे शक्य नव्हते. त्यामुळे आयकर अधिका-यांनी पोलिसांच्या सरंक्षणात ती रक्कम स्थानिक बँकेत जमा केली. त्यानंतर बँकेमार्फत डीडी तयार करून ती रक्कम नागपूरच्या रिझर्व्ह बँक आॅफ इंडियात जमा केल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली.