शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

२५ घरांची छपरे उडाली आदिवासी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:24 AM

तालुक्यातील बदनापूर, सोलामुह आणि कालापाणी या तीन गावांना गुरुवारी दुपारी अडीच वाजता चक्रीवादळ व पावसाने झोडपून काढले. यात २५ घरांचे छप्पर पूर्णपणे उडाले, तर जवळपास २०० घरांचे अंशत: नुकसान झाले.

ठळक मुद्देचक्रीवादळाचा फटका : बदनापूर, सोलामुह, कालापानी गावांत थैमान

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील बदनापूर, सोलामुह आणि कालापाणी या तीन गावांना गुरुवारी दुपारी अडीच वाजता चक्रीवादळ व पावसाने झोडपून काढले. यात २५ घरांचे छप्पर पूर्णपणे उडाले, तर जवळपास २०० घरांचे अंशत: नुकसान झाले. परिसरातील विद्युत खांब झोपले तसेच अनेक वृक्ष उन्मळून पडले. मात्र, जीवितहानी झाली नाही. आमदार, पं.स. सभापती आदी पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी गावाकडे धाव घेतली.चिखलदरा तालुक्यातील बदनापूर, कालापानी, सोलामुह आणि परिसरात गुरुवारी दुपारी मुसळधार पावसासह चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. बदनापूर येथे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. तेथील सुनील बेलसरे, रामलाल बेलसरे, देविदास धांडे, श्यामलाल चतुरकर, सहदेव बेलसरे, रामचंद्र काळे, सुरेश पाथरे, सखाराम बेलसरे, हिरामण सावरकर, गजानन शेलूकर, मान्सू झामरकर आदी जवळपास २५ आदिवासींच्या घराचे छप्पर उडाले. घरातील सर्व साहित्य पूर्णत: नष्ट झाल्याने आदिवासी उघड्यावर आल्याचे चित्र आहे. बदनापूर येथील विद्युत पुरवठा करणारे खांब जमीनदोस्त झाले, तर जवळपास दहा झाडे उन्मळून पडली.पदाधिकाऱ्यांची भेटचक्रीवादळाच्या तडाख्याने आदिवासींची दाणादाण उडाल्याची माहिती मिळताच आ. प्रभुदास भिलावेकर, पं.स. सभापती कविता काळे, दादा खडके, बबलू काळे, यशवंत काळे, दिनेश चव्हाण, सुमीत चावरे आदी पदाधिकाऱ्यांनी गावांना भेटी दिल्या. आदिवासींच्या निवास-भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे आ. प्रभुदास भिलावेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बियाणे भिजले, गर्भवती बचावलीआदिवासींनी उसनवारी घेऊन पेरणीसाठी आणलेले बियाणेसुद्धा छप्पर उडाल्याने मातीमोल झाले. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी व बियाण्यासाठी पुन्हा उसनवारी कुठून घ्यावी, असा प्रश्न श्यामलाल चतुर या शेतकऱ्याने उपस्थित केला. बदनापूर येथील एका घरात बसलेल्या गर्भवती महिलेच्या अंगावर छप्पर पडत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ तिला सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला

टॅग्स :Rainपाऊस