शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

२५ लाख झाडे देणार तुम्हाला प्राणवायू!, वनविभागाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 4:55 PM

Amravati : जिल्ह्यात 'अमृत वृक्ष आपल्या दारी, एक पेड माँ के नाम' योजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनविभागाने नाव संकल्प हाती घेत 'अमृत वृक्ष आपल्या दारी' ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत योजनेत वनमहोत्सव घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 'एक पेड माँ के नाम' योजनेचीही अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. प्रादेशिक, सामाजिक वनीकरण या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून २५ लाखांपेक्षा जास्त वृक्षलागवड केली जाणार आहे.

शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांना वृक्षारोपण उपक्रमासाठी वनमहोत्सवातून मोफत रोपे देण्यात येणार आहेत. या रोपांची लागवड करून भविष्यात आपापल्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याबरोबर निसर्ग संपन्न वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी वनविभागाने तयारी सुरू केली आहे. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, रिकाम्या जागेत वृक्षारोपण करावे, यासाठी शाळा, महाविद्यालयांनी मागणी केली आहे.

कोणत्या विभागाला किती उद्दिष्ट?

  • कृषी विभाग : २५०००
  • रेशीम विकास विभाग : १३०००
  • सार्वजनिक बांधकाम विभाग : ३५०००
  • सहकार व पणन : १०५००
  • शालेय शिक्षण : ५००००
  • सामाजिक न्याय : १५०००

झाडांना वाढविण्याची जबाबदारी कोणाची?

  • वनविभागाकडून लागवड केल्यानंतर त्याची निगा राखणे, संगोपनाची जबाबदारी प्रादेशिक, सामाजिक वनीकरणच्या आरएफओंची असणार आहे 
  • शासकीय आस्थापनांनी लागवड केल्यानंतर त्या विभागाचे प्रमुख आणि शाळा, महाविद्यालयात जबाबदारी स्वीकारलेल्या शिक्षक, प्राचार्य व प्राध्यापकांची राहणार आहे.

यंदा २५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टवनविभागाच्या चांदूर रेल्वे, वडाळी, मोर्शी, परतवाडा, वरूड वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाने २५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. परतवाडा वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात मेळघाटच्या पायथ्याजवळ वनक्षेत्र येते. आरएफओंना त्यांच्या कार्यक्षेत्रात वृक्षलागवडीचे टार्गेट दिले आहे.

गतवर्षी लावली १० लाखगतवर्षी १० लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र, अपुऱ्या पावसाने काही रोपे मृतावस्थेतद्य गेल्याने याचा फटका वृक्षलागवडीला बसला. त्यामुळे ३० टक्केच वृक्षलागवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वनमहोत्सवासह केंदम व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी नेमक्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सातत्याने समन्वय सुरु ठेवला जाणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने बांबू लावगड केली जाणार आहे. 'मनरेगा'अंतर्गत येणारे घटक व संबंधित ग्रामपंचायतीच्या मदतीने लागवड जपली जाणारा आहे.- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती