शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कॅलिफोर्नियातील २५ टक्के संत्राबागा ‘व्हेंटिलेटर’वर

By admin | Published: June 30, 2017 12:09 AM

जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आता अस्मानी संकट : मृग बहार हातचा गेला, संत्रा उत्पादक हैराण लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यातील २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवरील संत्रा बागांपैकी २५ टक्के बागा सुकण्याच्या मार्गावर असून येथील संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत. तालुक्यातील ९ सिंचन प्रकल्पांना बुड लागले आहे. अद्याप मृगबहार सुद्धा फुटलेला नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आलेल्या संत्राफळांना गळती लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संत्रा उत्पादकांना शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्याती प्रमुख प्र्रकल्पांपैकी एक शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलितक्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४६१.७७ मीटर असून ओलितक्षमता ३७० हेक्टर आहे. सातनूर प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५००.७५ मीटर तर ओलीतक्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलितक्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलित क्षमता ६३६ हेक्टरची आहे. वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा होता. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिल्याने तापमानात सुद्धा वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन मे महिन्यात हे सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामुळे तालुक्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. तालुक्यात १४ पाणीवापर संस्था असून रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणीवापर संस्थांना पाणी द्यावे लागते. आतार नद्यांनासुद्धा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. यावर्षी केवळ पाईपलाईनव्दारे सिंचन करणाऱ्या कपिलेश्वर पाणीवापर संस्था वगळता इतर संस्थांना पाणीवाटप बंद करण्यात आले. यातच तापमानसुद्धा वाढल्याने संत्राबागा सुकल्या आहेत. मृग बहारानेसुद्धा पाठ दाखविल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तालुक्यातील २५ टक्के संत्राबागा सुकल्या. जामगाव, पिपलागढ, कारली, महेंद्री, धनोडी, पुसला, लिंगा, शेंदूरजनाघाट, टेंभुरखेडा, बारगाव, बेनोडा मांगरुळी, लोणी, राजुराबाजार, हातुर्णा, आमनेरसह आदी परिसराचा समावेश आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा बागा सुकल्याचे तसेच आणि मृग बहार फुटला नाही. यातच जानेवारी फेब्रुवारीमध्ये अतितापमानात आंबिया संत्राबहारसुध्द्धा ५० ते ६० टक्के गळाला. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.