शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

गावाहुन परतताना माय-लेकी अचानक बेपत्ता; पाच दिवसांपासून शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 11:20 AM

प्रणालीने पती संजय यांना फोनवरून परत येत असल्याची माहिती दिली. यामुळे संजय हा मोझरी येथे दुपारी १ वाजता पोहोचला व बस थांब्यावर प्रणालीची प्रतीक्षा करत होता.

कुऱ्हा (अमरावती) : अंजनगाव ते मोझरी प्रवास करीत असलेल्या २५ वर्षीय विवाहितेसह तिची मुलगी बेपत्ता झाली आहे. १० सप्टेंबर रोजी ही घटना घडली. माहेरी महालक्ष्मी उत्सवाला हजर राहून परत येताना ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील संजय बेहरे यांची पत्नी प्रणाली बेहरे (वय २५) व मुलगी कृष्णाली बेहरे या महालक्ष्मीकरिता अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथे माहेरी गेल्या. वडील अशोक अस्वार यांनी मुलगी व नात यांना १० सप्टेंबरला सकाळी १० वाजता अंजनगाव सुर्जी येथून वऱ्हा येथे येण्याकरिता ट्रॅव्हल्समध्ये बसविले. मोझरी येथे त्या उतरणार होत्या. प्रणालीने पती संजय यांना फोनवरून ही माहिती दिली. यामुळे संजय हा मोझरी येथे दुपारी १ वाजता पोहोचला व बस थांब्यावर प्रणालीची प्रतीक्षा करत होता. वेळ झाला म्हणून संजयने पत्नी प्रणालीला फोन केला. पण, तिने फोन उचलला नाही.

संजय यांनी रात्री १० वाजता सासरी फोन केला. प्रणाली व कृष्णाली अद्यापही आल्या नसल्याचे सांगितले. यामुळे माहेरच्या मंडळींचीही पाचावर धारण बसली. तातडीने सासर व माहेरच्या नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली. पण, सर्व व्यर्थ ठरले. अखेर अशोक अस्वार यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाणे, तर संजय बेहरे यांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी