लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेलोरा विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकासकामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सर्व बाबी पूर्ण करण्याचे मौखिक आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वरिष्ठांनी दिले आहेत. तथापि, विमानतळाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्यास पुढे काहीच करता येणार नाही, असे बोलले जात आहे.दिल्ली येथील राइट्स कंपनीने विमानतळाचे मातीपरीक्षण पूर्ण केले. विद्युत सर्वेक्षणदेखील झाले. विमानतळावर प्रस्तावित विजेच्या कामांसंदर्भात पाहणी केली. शासनाने विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिगंसंदर्भात राइट्सवर दोन कोटी खर्च केले. टोपोग्राफिकल सर्व्हे, धावपट्टीचे निरीक्षण, एटीएस टॉवरची पाहणी करण्यात आली. नाईट लँडिंग, रन-वे लांबी वाढविण्याबाबत नव्याने सर्वेक्षण झाले. विमानांच्या नाइट लँडिंगसंदर्भात विमानतळ परिसरातच ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. रन-वेवर येणाऱ्या समस्यांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरमध्ये इत्थंभूत बाबींचा अंतर्भाव असेल.येत्या मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी बेलोरा विमानतळावर विविध विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवरचा प्लॅन तयारबेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार विमानतळ विकास कंपनीने विकासकामे हाती घेतली आहेत. माती परीक्षणानंतर विद्युत सर्वेक्षण पूर्ण झाले. दरम्यान, राइट्स कंपनीकडून टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीसाठी नकाशा तयार करण्यात आला आहे. धावपट्टीची लांबी वाढविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.अमरावतीहून विमानसेवा सुरू करणे हे फार गरजेचे आहे. विकासकामे पूर्णत्वासाठी २५० कोटींची गरज आहे. मंगळवारी अर्थमंत्र्यांची भेट घेण्यात आली. अर्थसंकल्पात निधी दिला जाईल, असे त्यांनी आश्वासित केले आहे.- सुनील देशमुखआमदार, अमरावती
बेलोरा विमानतळ विकासासाठी हवे २५० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:28 PM
बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.
ठळक मुद्देआचारसंहितापूर्वीच निविदांची लगबग : अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक