लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सर्व भाज्यांचा राजा ठरलेले कर्टुले मंगळवारी ठोकमध्ये चक्क २५० " किलो या दराने विकले गेले. मंगळवारी पहिल्यांदाच या ऋतूत कर्टुले परतवाड्यात दाखल झाले. चिल्लरमध्ये हे कर्टुले ग्राहकांना पावाला शंभर " दराने विकत घ्यावे लागले.कर्टुले-कटोले खाणाऱ्या शौकिनांचा एक वेगळाच वर्ग आहे. कितीही महाग असले तरी ते त्यांना हवेच असतात. भाजी खाल्यानंतर ‘आज कटोल्याची भाजी खाल्ली’ असे अभिमानाने सांगणारेही बरेच आहेत. त्यामुळे या कर्टुल्यांना वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त आहे. दरातील तेजी व अल्प कालावधीतील उपलब्धता यामुळे सर्व भाज्यांचा राजा म्हणून त्याकडे बघितले जाते.कर्टुले बाजारात कधी येतात याची वाट पाहणारेही अधिक आहेत. कर्टुले ही रानभाजी आहे. याचे कंद जमिनीत असतात. जमिनीच्या वर वेल येतो आणि त्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यात हे कर्टुले लागतात. मेळघाटातील आदिवासी बांधव हे कर्टुले टोपल्यांमधून शहरात विकायला आणतात. पावसाळ्याच्या केवळ ३० ते ४० दिवस हे कटोले बाजारात उपलब्ध होत असतात.या कर्टुल्यांना आदिवासी बांधव करटवले, काटलुज असेही म्हणतात. इंग्रजीत याला ‘वाईटल्ड करेला फ्रूट’ म्हटले जाते, शिवाय ककोडा, करटोली, कंटोली या नावानेही कर्टुले ओळखले जातात.औषधी गुणकर्टुले औषधी गुणांनी युक्त आहेत. यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन, मिनरल उपलब्ध आहेत. त्यांचा कंदसुद्धा औषधी गुणधर्माने युक्त आहे. डायबिटीज, डोकुदुखी, किडनी स्टोन यावर या कंदाचे चूर्ण उपयोगी आहे. पिवळसर आणि हिरव्या रंगाचे हे कर्टुले केवळ भाजी नसून, औषधीसुद्धा आहे.कर्टुले कारल्याच्या कुटुंबातील सहा रानभाज्यांपैकी एक आहे. डायबीटीजवर ती उपयुक्त आहेत. कर्टुल्याचे कंद ही औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत. आयुर्वेद वैद्यकीय उपचार प्रणालीत कर्टुल्याचा वापर केला जातो.- डॉ. रा.भा. गिरीपरतवाडां
कर्टुले २५० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 1:38 AM
कर्टुले-कटोले खाणाऱ्या शौकिनांचा एक वेगळाच वर्ग आहे. कितीही महाग असले तरी ते त्यांना हवेच असतात. भाजी खाल्यानंतर ‘आज कटोल्याची भाजी खाल्ली’ असे अभिमानाने सांगणारेही बरेच आहेत. त्यामुळे या कर्टुल्यांना वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त आहे. दरातील तेजी व अल्प कालावधीतील उपलब्धता यामुळे सर्व भाज्यांचा राजा म्हणून त्याकडे बघितले जाते.
ठळक मुद्देरानभाजी : चिल्लरमध्ये १०० रुपये पावाचा भाव