लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्लास्टिकबंदीसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास २५ हजारांच्या दंडासह ३ महिने कारावास भोगावा लागणार आहे. महापलिकेने कायद्यातील या तरतुदीबाबत जनजागृती चालविली असून त्याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांना ‘प्लास्टिक मुक्ती’ची शपथ देण्यात आली. मध्यंतरी व्यापक प्रमाणात ही मोहीम राबविण्यात आली. व्यापाºयांकडून ६ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला. मात्र मागील आठवड्यापासून या मोहिमेला बे्रक लागल्याने प्लास्टिकबंदीचे तीनतेरा वाजले आहेत.बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर, संकलन, वाहतूक, खरेदी-विक्री व उत्पादन करणाºयांवर कारवाई करून त्यांना प्रथमत: पाच हजार रूपये दंड, तर दुसºयांदा १० हजार रूपये व तिसºयांदा २५ हजार रूपये दंड, तीन महिन्यांची शिक्षा करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने या कारवाईचा पुनरूच्चार केला असून त्यासाठी झोननिहाय पथके कार्यान्वित करण्यात आली आहे. आतापर्यंत बंदी झुगारणाºया व्यावसायिकांकडून सहा लाखांवर दंड वसूल करण्यात आला.सोबतच कचरा जाळणाºया व्यक्तीलाही पाच हजारांचा दंड महापालिकेतर्फे ठोठावण्यात येणार आहे. नियमाप्रमाणे प्लास्टिक पिशव्या तयार करणाºया व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे दरमहा शुल्क भरणे गरजेचे राहिल. तसेच त्यांना दुकानासमोर प्लास्टिकच्या पिशव्या विकत मिळतील, असा फलक लावावा लागेल. विक्रीसाठी ठेवलेल्या पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या नसाव्यात, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. कॅरिबॅगचा वापर सर्रास सुरू आहे.
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरिबॅग वापरणाºयांकडून दंड वसूल करण्यात आला. महापालिका क्षेत्रात कारवाईची मोहीम राबविली जाईल.- नरेंद्र वानखडे,उपायुक्त, महापालिका