लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: प्लास्टिकबंदीच्या अनुषंगाने सोमवारी झोन क्रं २ च्या पथकाने बसस्थानक मार्गावरील एका प्रतिष्ठानातून २.६० क्विंटल प्लास्टिक जप्त केले. आस्थापनाधारकाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम आणि सहायक आयुक्त सुनील पकडे यांच्या नेतृत्वात दुपारी ही कारवाई करण्यात आली. जेष्ट स्वास्थ्य निरिक्षक सिध्दार्थ गेडाम यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन ते डेपो रोडवरील नितीन एन्टरप्रायजेस या आस्थापनेची झाडाझडती घेतली. तेथे प्रतिबंधित प्लास्टिकचा मोठा साठा आढळून आला. त्यामुळे गेडाम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथे बोलावून घेतले. त्यानंतर अधिकाºयांच्या उपस्थितीत प्रतिबंधित प्लास्टिकचा २.६० क्विंटल साठा जप्त करण्यात आला. यापूर्वी शनिवारी सुध्दा एका प्रतिष्ठाानातून १ क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. महापालिका पथकाने प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाºयांकडून ५५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आह. कारवाईत स्वास्थ्य निरिक्षक धनीराम कलोसे, प्रशांत गावनेर, मनिष हडाळे, जेधे आदी सहभागी झालेत.दोनच सहायक आयुक्त आॅनफिल्डमहापालिकेने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी झोनस्तरावर स्वास्थ्य निरिक्षकांची पथके गठित केलीत. कारवाईचे सुकाणू सहायक आयुक्तांकडे देण्यात आले आहे. मात्र, सुनील पकडे आणि मंगेश वाटाणे हे दोनच सहायक आयुक्त प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन प्लास्टिक संदर्भातील कारवाई करीत आहेत.
२.६० क्विंटल प्रतिबंधित प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:28 PM
प्लास्टिकबंदीच्या अनुषंगाने सोमवारी झोन क्रं २ च्या पथकाने बसस्थानक मार्गावरील एका प्रतिष्ठानातून २.६० क्विंटल प्लास्टिक जप्त केले. आस्थापनाधारकाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.
ठळक मुद्देझोन २ ची कारवाई : ५ हजारांचा दंड